agriculture news in marathi, banana growers waiting for crop insurance, jalgaon, maharashtra | Agrowon

केळी पीकविमाधारकांना परताव्यांची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी कमाल केळी उत्पादक अतिथंडी, अतिउष्णता व वादळासंबंधीच्या नुकसानभरपाईसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना विमा परताव्यांचे वितरण सुरू करण्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. 

जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभागी कमाल केळी उत्पादक अतिथंडी, अतिउष्णता व वादळासंबंधीच्या नुकसानभरपाईसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना विमा परताव्यांचे वितरण सुरू करण्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. 

जिल्ह्यात सुमारे २२ हजार केळी उत्पादक या विमा योजनेत सहभागी झाले होते. नोव्हेंबर २०१८ ते जुलै २०१९ या नऊ महिन्यांच्या कालावधीसंबंधी संबंधित विमाधारकांच्या केळी पिकाला विमा संरक्षण मिळाले आहे. जिल्ह्यात डिसेंबरपासून प्रतिकूल हवामानामुळे केळीचे नुकसान होत आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यात अनेक दिवस किमान तापमान पाच अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. एप्रिल, मे व जून महिन्यात कमाल तापमान प्रत्येकी ४७, ४८ व ४५ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. चोपडा, यावल, रावेर, जळगाव, पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर या केळी उत्पादक तालुक्‍यांमध्ये वादळामुळेही केळी जमीनदोस्त झाली आहे. वादळासंबंधी पंचनाम्यांची कार्यवाही अनेक ठिकाणी विमा कंपनीने शासकीय यंत्रणांच्या मदतीने पूर्ण केली. त्याचे अहवाल विमा कंपनीकडे पोचले असून, वादळात ६० ते ७० टक्के नुकसान अनेक भागात झाले आहे. 

अतिथंडी, अतिउष्णता व वादळात नुकसानीसंबंधी कमाल केळी विमाधारक परतावे मिळण्यास पात्र ठरले आहेत. विमा कालावधी जुलैअखेर पूर्ण होईल. मागील वर्षी विमा कालावधी संपल्यानंतर चार महिन्यांनी विमा परतावे संबंधित विमा कंपनीने दिले होते. तेदेखील अपूर्ण स्वरूपात दिले होते. परंतु या हंगामात हे परतावे ऑगस्टपासूनच वितरित करावेत. कारण, पावसाळ्यात अतिवृष्टी व गारपिटीसंबंधीची नुकसानभरपाई विमा योजनेतून मिळत नाही. यामुळे पुढे फारसे नुकसान होणार नाही, हे गृहीत धरून देय परतावे देण्याची तयारी काही नियम बाजूला करून सुरू करावी. कारण केळी उत्पादक नुकसानीमुळे व कमी दरांच्या प्रश्‍नाने आर्थिक संकटात सापडले आहेत, असे केळी उत्पादकांनी म्हटले आहे. 

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...