agriculture news in marathi, Banana murchents suffring for urea | Agrowon

युरियासाठी केळी बागायतदारांची वणवण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

जळगाव : जिल्ह्यात खतपुरवठा संथगतीने सुरू असून, त्यात युरियाची उपलब्धता अतिशय कमी आहे. जुना ५० किलो प्रतिगोणीचा युरिया संपला आहे. नवीन युरिया येत नसल्याने खतटंचाई निर्माण झाली आहे.

जळगाव : जिल्ह्यात खतपुरवठा संथगतीने सुरू असून, त्यात युरियाची उपलब्धता अतिशय कमी आहे. जुना ५० किलो प्रतिगोणीचा युरिया संपला आहे. नवीन युरिया येत नसल्याने खतटंचाई निर्माण झाली आहे.

रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव भागातील केळी उत्पादकांना युरियाच मिळत नसल्याची स्थिती आहे. सर्वच खत विक्रेते युरिया उपलब्ध नसल्याचे सांगत असून, लिंकिंगही सुरू असल्याची कुरबूर आहे. खताचा वरून पुरवठाच नसल्याचे विक्रेते सांगत आहेत. २० गोण्या हव्या असल्या तर पाच गोण्या देतात. त्यावर आणखी एखादी विद्राव्य किंवा भुकटी स्वरूपातील अन्नद्रव्य लिंकिंगच्या स्वरूपात देतात. त्यावर ३०० ते ३५० रुपये जादा खर्च उचलावा लागत आहे. हा प्रकार मागील महिन्यातही सुरू होता, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

युरियाचा पुरवठा फक्त ४० टक्केच झाला आहे. जिल्ह्यास या हंगामात अखेरपर्यंत सुमारे सव्वालाख मेट्रिक टन युरिया उपलब्ध करून देण्याचा पुरवठा लक्ष्यांक मंजूर आहे. परंतु अजून ५० हजार मेट्रिक टन युरियाही दाखल झालेला नाही, अशी माहिती मिळाली. केळी, ऊस उत्पादक सध्याच्या दिवसांमध्ये युरिया अधिक खरेदी करतात. ड्रीप व बेसल डोस अशा स्वरूपात हे खत दिले जाते. ते देणे गरजेचे आहे. परंतु युरिया नसल्याने काही शेतकरी मॅग्नेशिअम सल्फेटची खरेदी करून ते ड्रिपद्वारे देत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद...
धुळे : कांदा दरप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे...धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने...
शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २०...सांगली : शिराळा पश्‍चिम भाग हा भातपिकाचे माहेरघर...
शेतकऱ्यांना दरवर्षी दहा हजार देणारच :...इस्लामपूर, जि. सांगली  : ‘‘ गेल्या पाच...
उत्पादन खर्चावर आधारित दर हवेत :...भारत हा शेतीप्रधान देश असे आपण म्हणत असतो. मात्र...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच : उध्दव...सोलापूर : ‘‘शिवसेना बोलते ते करते, आम्ही...
अकोला जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव...अकोला ः शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवून...
पीकविम्याबाबत असुरक्षिततेचीच भावना...केंद्र सरकारने मोठा गाजा-वाजा करीत जाहीर केलेल्या...
`चासकमान`मधील आवर्तन तब्बल ८९...चास, जि. पुणे  ः चासकमान (ता. खेड) धरणातून...
पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यावर भर...आपला देश सध्या आर्थिक संकटातून जात आहे. हे संकट...
परभणीत सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील...
पाच जिल्ह्यात पीकविमा योजनेत ४५ लाख ९०...लातूर : खरीप हंगाम २०१९ मध्ये लातूर,...
नांदेड : पावसात भिजल्यामुळे पिकांचे...नांदेड : गेल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली...
जळगावात कोबी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
नारळ बागेत आंतरपिके फायदेशीरसुरवातीच्या काळात नारळ बागेत भाजीपाला, केळी, अननस...
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...