agriculture news in marathi, banana plantation area Increase in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात केळी लागवड क्षेत्रात वाढ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नांदेड ः यंदा लवकरच विहिरी, बोअरची पाणीपातळी वाढली आहे. इसापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सिंचनासाठी पाणी मिळण्याची खात्री झाली आहे. सद्यःस्थितीत काही भागांत केळी लागवड सुरू आहे.

आॅक्टोबर महिन्यातील कांदेबाग लागवड आणि फेब्रुवारी महिन्यातील रामबाग केळी लागवडदेखील अपेक्षित आहे. त्यामुळे यंदा नांदेड जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे. नांदेड जिल्ह्यात केळीचे सरासरी क्षेत्र १० हजार हेक्टरपर्यंत असल्याचे मानले जाते.

नांदेड ः यंदा लवकरच विहिरी, बोअरची पाणीपातळी वाढली आहे. इसापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सिंचनासाठी पाणी मिळण्याची खात्री झाली आहे. सद्यःस्थितीत काही भागांत केळी लागवड सुरू आहे.

आॅक्टोबर महिन्यातील कांदेबाग लागवड आणि फेब्रुवारी महिन्यातील रामबाग केळी लागवडदेखील अपेक्षित आहे. त्यामुळे यंदा नांदेड जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे. नांदेड जिल्ह्यात केळीचे सरासरी क्षेत्र १० हजार हेक्टरपर्यंत असल्याचे मानले जाते.

अर्धापूर, नांदेड, मुदखेड, हदगाव, भोकर आदी तालुक्यांत केळीची लागवड केली जाते. केळी लागवडीचे जून-जुलै (मृगबाग), आॅक्टोबर (कांदेबाग), फेब्रुवारी (रामबाग) असे तीन लागवड हंगाम मानले जातात. यंदा मृगबाग केळीचे लागवड क्षेत्र जास्त आहे. यंदाच्या हंगामात आजवर ८ हजार हेक्टरवर केळी लागवड झाली असल्याचा अंदाज आहे.

अल्प पावसामुळे सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांत केळी लागवड क्षेत्रात घट झाली. तुलनेने कमी पाण्यावर किफायतशीर उत्पादन देणाऱ्या हळद या नगदी पिकांचा पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारला आहे. परंतु यंदा विहिरी, बोअरना मुबलक प्रमाणात पाणी आले आहे.

इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या धरणातील पाणीसाठा ६५ टक्क्यांपर्यंत, तर सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठा २५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. इसापूर धरणातून सिंचनासाठी पाणी आवर्तन मिळण्याची खात्री झाली आहे. त्यामुळे अर्धापूरसह अन्य तालुक्यांतील काही भागांत अजून केळी लागवड सुरू आहे.

मूग, सोयाबीनच्या काढणीनंतर आॅक्टोबर महिन्यात तसेच पाण्याच्या उपलब्धतेनुसार फेब्रुवारी महिन्यातदेखील लागवड होऊ शकते. त्यामुळे केळी लागवड क्षेत्रात आणखीन २ हजार हेक्टरची वाढ अपेक्षित आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यातील केळी लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे.

चांगले उत्पादन मिळते त्यामुळे मृगबाग केळीचे क्षेत्र अधिक आहे. इसापूर धरणातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे लागवड क्षेत्र वाढणार आहे.
- प्रा. आर. व्ही. देशमुख,
प्रभारी अधिकारी, वनामकृवि केळी
संशोधन केंद्र, नांदेड.

इसापूर धरणातून पाणी मिळण्याची खात्री झाली आहे. मूग, सोयाबीन नंतर अनेक शेतकरी केळी लागवड करतील.
- ज्ञानेश्वर माटे,
शेतकरी, अर्धापूर, जि. नांदेड

गतवर्षी तीन एकरवर केळी लागवड केली होती. यंदा विहिरींना मुबलक पाणी आल्याने दीड एकरने क्षेत्र वाढवले आहे. अंतरात बदल करून बेड पद्धतीची लागवड केली.
- शिवाजी देशमुख,
शेतकरी, पार्डी, जि. नांदेड.

इतर बातम्या
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
मराठवाड्यात मजूर मिळेना, वेचणीचे दर...औरंगाबाद : जोरदार पावसाने केलेल्या नुकसानीतून...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन...परभणी : जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील दोन...
सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१...सोलापूर : खरिपामध्ये पावसाने हुलकावणी दिली. पण,...
सातारा जिल्ह्यात आले पिकावर ‘करपा’चा...सातारा  ः अतिपावसाचा फटका इतर पिकांप्रमाणे...
पावसामुळे स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबणीवरपुणे : मॉन्सूनचा लांबलेला मुक्काम आणि...