agriculture news in marathi, banana plantation decrease, nanded, maharashtra | Agrowon

नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत होणार केळी लागवड क्षेत्रात घट 
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

दरवर्षी १५ हजार केळी रोपांची लागवड करत असतो. परंतु यंदा विहिरीला पाणी उपलब्ध नसल्यामुळे केवळ २ हजार केळी रोपांची लागवड केली आहे. येत्या काळात पाण्याच्या उपलब्धतेवरच केळी लागवडीचे भवितव्य अवलंबून आहे.
- शिवाजीराव देशमुख, बारड, ता. मुदखेड, जि. नांदेड

नांदेड  : गतवर्षीची दुष्काळी स्थिती आणि यंदाच्या पावसाळ्यात आजवर पुरेसा पाऊस न झाल्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे यंदा नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील मृगबाग केळीच्या लागवड क्षेत्रात घट होणार आहे. येत्या काळात पाण्याच्या उपलब्धतेवर केळी लागवडीचे भवितव्य अवलंबून आहे. पाणी उपलब्ध झाले तर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत कांदेबाग केळी लागवड होऊ शकेल.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळीचे क्षेत्र १६ ते १८ हजार हेक्टरपर्यंत आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड या तालुक्यांसह हदगाव, भोकर या तालुक्यांतील काही भागांत केळीचे लागवड क्षेत्र आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, पाथरी, मानवत तालुक्यात केळीचे क्षेत्र आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी तालुक्यात केळी लागवड केली जाते. जून ते जुलै या कालावधीत मृगबाग केळीची लागवड केली जाते. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती असल्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे केळी लागवडीखालील क्षेत्रात दरवर्षी घट होत आहे.

गतवर्षी नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक पट्ट्यात पाणी उपलब्ध होते. त्यामुळे मृगबाग केळी लागवड झाली होती. इसापूर धरणाच्या कालव्याचे पाणीदेखील यंदाच्या उन्हाळ्यापर्यंत मिळाले होते. यंदा अद्याप इसापूर धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. विहिंरीनादेखील पाणी नाही. त्यामुळे केळी लागवडीचे प्रमाण कमी आहे. मुबलक पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी केळी लागवड केली असली तर क्षेत्र कमी केले आहे.

इसापूर कालव्याच्या पाण्याचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा, गिरगाव, कुरुंदा या भागांतील केळी उत्पादकांना झाला. परंतु सिंचनासाठी पाणी पुरसे असूनसुद्धा तापमानवाढीमुळे केळी होरपळल्याने उत्पादकांचे नुकसान झाले. मृगबाग केळी लागवडीचा कालावधी संपला आहे. त्यामुळे केळीच्या क्षेत्रात घट होणार आहे.

प्रतिक्रिया

दरवर्षी केळी लागवड करत असतो. गतवर्षी सहा एकरांवर लागवड केली होती. परंतु पाणी कमी पडल्याने चार एकरावरील केळीची झाडे मोडून टाकली. पाणी नसल्यामुळे केळी लागवड करता येत नाही. 
- माणिकराव सूर्यवंशी, सिंगणापूर, जि. परभणी

जुन-जुलै महिन्यांत मृगबाग केळीची लागवड केली जाते. परंतु यंदा पाऊसमान कमी आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे केळी लागवड क्षेत्रात घट होणार आहे. येत्या काळात पाणी उपलब्ध झाले तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कांदेबाग केळी लागवड होऊ शकेल.
- प्रा. आर. व्ही. देशमुख, प्रभारी अधिकारी, केळी संशोधन केंद्र, नांदेड

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...