agriculture news in marathi, banana plantation on three hundred hector, jalgaon, maharashtra | Page 3 ||| Agrowon

जळगाव जिल्ह्यात अर्ली कांदेबाग केळीची ३०० हेक्टरवर लागवड

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

जळगाव  ः जिल्ह्यात चोपडा, जळगाव व पाचोरा भागात मिळून सुमारे ३०० हेक्‍टरवर अर्ली कांदेबाग केळीची लागवड झाली आहे. ही लागवड नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू राहील, असे संकेत आहेत. 

जळगाव  ः जिल्ह्यात चोपडा, जळगाव व पाचोरा भागात मिळून सुमारे ३०० हेक्‍टरवर अर्ली कांदेबाग केळीची लागवड झाली आहे. ही लागवड नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू राहील, असे संकेत आहेत. 

अर्ली कांदेबाग केळी लागवड मागील महिन्याच्या मध्यात तसेच अखेरीला सुरू झाली. जळगाव व चोपडा तालुक्‍यांतील तापी काठावरील गावांमध्ये ही लागवड अधिक झाली आहे. केळीचे दर मागील दोन महिन्यांपासून टिकून आहेत. शिवाय दर्जेदार केळीला यंदा चांगले दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी धावपळ करून कंद, उतिसंवर्धित रोपांची व्यवस्था करून घेतली व या केळीची लागवड केली. जळगाव तालुक्‍यातील खेडी खुर्द, पिलखेडा, फुपणी, गाढोदे, किनोद, कठोरा, भादली खुर्द, भोकर, सावखेडा खुर्द या भागांत तर चोपडामधील गोरगावले, खेडीभोकरी, माचले, पुनगाव, देवगाव, वाळकी, विटनेर, वढोदा आदी भागांत अर्ली कांदेबाग केळीची लागवड काही शेतकऱ्यांनी केली आहे.

मुगाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात अर्ली कांदेबाग लागवड अधिक आहे. कारण या क्षेत्रात सेंद्रिय कर्ब तयार होते व यामुळे पिकाची वाढ जोमात होते. शिवाय यंदा परतीचा पाऊस सुरूच असल्याने जमिनीत वाफसा कायम आहे. सिंचनाची कुठलीही गरज या अर्ली कांदेबाग केळीला अजून भासलेली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारीखाली रिकाम्या होणाऱ्या क्षेत्रात ऑक्‍टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये कांदेबाग केळी लागवडीचे नियोजन केले आहे. यंदा जळगाव, चोपडा व पाचोरा भागात मिळून सुमारे सहा हजार हेक्‍टरवर कांदेबाग केळीची लागवड होण्याची अंदाज आहे. लागवडीसाठी कंदांचा तुटवडा आहे. अनेक शेतकरी रावेर, यावल, मध्य प्रदेशातील पातोंडी, नाचणखेडा, बहादरपूर, नंदुरबारमधील अक्कलकुवा, शहादा, तळोदा भागांतून कंद आणत आहेत. या भागातून कंद शेतापर्यंत आण्यासाठी प्रतिकंद सहा ते सात रुपये खर्च येत आहे. यात वाहतुकीचा खर्च अधिक आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...