Agriculture news in Marathi Banana prices stable in Khandesh | Agrowon

खानदेशात केळी दर स्थिर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 सप्टेंबर 2021

खानदेशात कांदेबाग केळीची आवक दिवसागणिक वाढत आहे. दरही उठाव कायम असल्याने स्थिर आहेत. सध्या चोपडा, जळगाव, पाचोरा-भडगाव, जामनेर, धुळ्यातील शिरपूर येथे काढणीला वेग आला आहे. किमान दर ७०० व कमाल दर १२२० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे.

जळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची आवक दिवसागणिक वाढत आहे. दरही उठाव कायम असल्याने स्थिर आहेत. सध्या चोपडा, जळगाव, पाचोरा-भडगाव, जामनेर, धुळ्यातील शिरपूर येथे काढणीला वेग आला आहे. किमान दर ७०० व कमाल दर १२२० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. 

मध्यंतरी कमाल दर १२४० रुपयांवर होते. दरात किंचित घसरण झाली, पण गणेशोत्सवात केळीला उठाव वाढल्याने दर स्थिरावले. खानदेशात सध्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा व अक्कलकुवा भागात फारशी केळी काढणीवर नाही. या भागात कांदेबाग केळीची लागवड अपदाने केली जाते. यामुळे या भागात केळीची आवक अधिकची नाही. केळीची आवक चोपडा तालुक्यात अधिक आहे. यापाठोपाठ धुळ्यातील शिरपूर, जळगाव आदी भागात कांदेबाग केळीची काढणी सुरू आहे. दर्जेदार केळीला चांगली मागणी आहे. 

उत्तर प्रदेश, पंजाब, काश्मिरात काही मोठे खरेदीदार केळीची पाठवणूक करीत आहेत. दर्जेदार केळीची बॉक्समध्ये पॅकिंग करून तिची पाठवणूक केली जात आहे. दर्जेदार केळीचे दर १२२० रुपये एवढे आहेत. पण कमी दर्जाच्या केळीची खरेदी ६०० ते ६५० रुपये प्रतिक्विंटल या दरात केली जात आहे. शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. कारण जाहीर दरांच्या तुलनेत कमी दरात खरेदी केली जात आहे. याकडे जळगाव, चोपडा बाजार समितीचे सपशेल दुर्लक्ष आहे. 

मध्यंतरी जळगाव बाजार समितीने याबाबत काही खरेदीदारांना नोटिसा बजावल्या, परंतु पुढे काय कार्यवाही झाली, हे सांगितले जात नाही. यामुळे बाजार समित्यांची भूमिकादेखील संशयास्पद असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सणासुदीमध्ये केळी दर स्थिर राहतील, असा अंदाज सुरवातीला जाणकारांनी व्यक्त केला होता. पण व्यापाऱ्यांची लॉबी जुमानत नसल्याने दरांबाबत तक्रारी कायम आहेत.


इतर अॅग्रो विशेष
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचेपुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट...
पहिली उचल ३३०० द्यावी ः राजू शेट्टी...कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३००...
कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३...पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर...
ट्रॅक्टरचलित विविध यंत्रांद्वारे वेळ,...ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी...
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...