agriculture news in marathi Banana prices under pressure again in Khandesh | Agrowon

खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत. उत्तरेकडून कमी झालेली मागणी व लॉकडाऊन, कोरोनाची भिती, यामुळे दरात चढउतार सुरू आहेत. प्रतिक्विंटल २५० ते ५०० रुपयांपर्यंतचे दर आहेत. 

जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत. उत्तरेकडून कमी झालेली मागणी व लॉकडाऊन, कोरोनाची भिती, यामुळे दरात चढउतार सुरू आहेत. प्रतिक्विंटल २५० ते ५०० रुपयांपर्यंतचे दर आहेत. 

सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनर, यावल, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, अक्कलकुवा भागात केळीची काढणी सुरू आहे. उतिसंवर्धित रोपांच्या केळी बागांची लागवड रावेर, यावल, शिरपूर, शहादा भागात अधिक झाली होती. या भागात दर्जेदार केळीचे उत्पादन येत आहे. तर, इतर भागातही चांगले व्यवस्थापन करून दर्जेदार केळीचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. परंतु, केळी दर २०१५-१६ नंतर नीचांकी पातळीवर प्रथमच पोचले आहेत. 

मध्यंतरी रमजानमुळे उत्तरेकडे केळीची चांगली मागणी होती. एकट्या रावेरातून रोज १८० ते १८५ ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची पाठवणूक उत्तरेकडे सुरू होती. तसेच मुक्ताईनगर, यावल भागातील केळीची खरेदी मध्यप्रदेशातील एजंटदेखील करीत होते. परंतु, रमजान महिना जसा अंतिम टप्प्यात पोचला, तशी केळीची मागणी कमी होत गेली. आवक स्थिर आहे. सध्या रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात मिळून रोज २६० ट्रक तर धुळ्यातील शिरपूर, नंदुरबार जिल्ह्यात मिळून रोज ६० ते ६५ ट्रक केळीची काढणी सुरू आहे. अर्थातच खानदेशात रोज किमान ३२० ते ३३५ ट्रक केळीची आवक सुरू आहे. 

‘पणन’चा गोंधळ कायम 

केळीला सर्वाधिक मागणी उत्तर भारतात असते. तसेच राज्यात नागपूर, पुणे, मुंबई, छत्तीसगड येथेही केळीची पाठवणूक केली जाते. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेला पणन व्यवस्थेचा गोंधळ कायम आहे. अनेक ग्राहक भितीमुळे केळीची खरेदी टाळत आहेत. तर, पुणे, मुंबईमध्ये बाजार विस्कळीत झाले आहेत. परिणामी, राज्यात केळीची हवी तशी मागणी नाही, अशी माहिती केळी व्यापारातील जाणकार सुधाकर चव्हाण यांनी दिली. 
 
 


इतर ताज्या घडामोडी
पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा :...औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक...जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
हतनूर धरणाची साठवण क्षमता घटलीभुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन...
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा...जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक...
रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदीअकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला...
खानदेशात सर्वदूर पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात पेरणी ८८ टक्‍क्‍यांवर पोचली असून...
परभणीत २५ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस...परभणी  : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजीपाला,...रत्नागिरी : कोरोना टाळेबंदीत जिल्ह्यातील महिला...
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया...सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून...
नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरानगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये...
परभणी जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणीपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार...
अकोला जिल्ह्यात पीक कर्जापासून ५२ टक्के...अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून,...
पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भातलागवडनाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी...
बियाणे भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे...नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी...
जळगाव, धुळ्यात युरियाची टंचाई कायमधुळे ः जळगाव व धुळे जिल्ह्यांत युरियासह १०.२६.२६...
महाजॉब्स संकेतस्थळाच्या माध्यमातून...मुंबई : देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की...
केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय...कऱ्हाड, जि. सातारा ः अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा...
करमाळ्यातील आदिनाथ कारखाना...करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ...
हॉटेल्स, लॉज उद्यापासून सुरू होणारमुंबई : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर ८ जुलैपासून...
जनहितचे धरणे अन् तत्काळ शेतकऱ्यांच्या...सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर -...