agriculture news in Marathi banana producers oppose to crop insurance Maharashtra | Agrowon

फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा बहिष्कार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी पिकासाठी मानके (परतावा निकष) बदलल्याने जिल्ह्यातील अनेक केळी उत्पादकांनी या योजनेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती.

जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी पिकासाठी मानके (परतावा निकष) बदलल्याने जिल्ह्यातील अनेक केळी उत्पादकांनी या योजनेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. या भूमिकेला अनेक शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असून, फक्त पाच हजार शेतकऱ्यांनी या योजनेत बुधवारपर्यंत (ता. २८) सहभाग घेतला आहे. 

थंडी व तापमानासंबंधी हेक्टरी सात हजार व वादळ आणि गारपिटीसंबंधीच्या विमा संरक्षणासाठी हेक्टरी दोन हजार ३६३ रुपये विमा हप्ता भरला जात आहे. विमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांची कॉमन सर्व्हिस सेंटरला (सीएससी) पसंती आहे. बँकेतही काही कर्जदार शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरून विमा संरक्षण घेतले आहे. विमा हप्ता भरण्यासंबंधी धरणगाव, जळगाव, चोपडा, जामनेर या तालुक्यात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे. परंतु यावल, रावेर, मुक्ताईनगर या भागांत फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. 

विमा संरक्षण घेऊनही नुकसान झाल्यानंतर परतावे मिळण्याची शक्यता कमी आहे. परतावे मिळू शकणार नाहीत, यामुळे शेतकऱ्यांनी मानके बदलण्यासाठी सुमारे तीन महिने राज्य सरकार व केंद्रातील मंडळींकडे पाठपुरावा केला, परंतु शासनाने  शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली नाही. यामुळे या योजनेला यंदा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

केवळ पाच हजार शेतकऱ्यांचे अर्ज
जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी (२०१९-२०) ४५ हजार केळी उत्पादकांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते. ५४ हजार हेक्टर क्षेत्रासाठी हे विमा संरक्षण घेण्यात आले होते. यंदा ३१ ऑक्टोबरपर्यंत विमा हप्ता भरण्याची मुदत आहे. ही मुदत येत्या शनिवारी संपणार आहे. आतापर्यंत फक्त पाच हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत. तर आणखी पाच ते सहा हजार शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात, असा अंदाज आहे. अर्थातच यंदा फक्त ११ ते १२ हजार शेतकरी या योजनेत सहभागी होतील, अशी स्थिती आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
सोयाबीनचे ३६ लाख क्विंटल बियाणे...पुणे : राज्यातील शेतकरी बाजारातून दहा लाख क्विंटल...
काही ठिकाणी हलक्या सरी पुणे : निवार चक्रिवादळ निवळत असताना जमिनीवरून...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
सोयाबीन दरात मंदीची शक्यता नाही पुणे ः केंद्र सरकारने गुरुवारी (ता.२७) कच्च्या...