agriculture news in Marathi, banana purchase on low rate in Khandesh, Maharashtra | Agrowon

खानदेशात केळीची कमी दरात खरेदी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जून 2019

माझी सुमारे १५ एकरांत नवती केळी असून, तिची काढणी सुरू आहे. परंतु व्यापारी जे दर जाहीर होत आहेत, त्यापेक्षा ३०० रुपये क्विंटलमागे कमी देत आहेत. ही लूट मागील महिनाभरापासून सुरू आहे. याबाबत संबंधितांवर कडक कारवाई व्हावी. 
- एक शेतकरी, दापोरी (जि. जळगाव)

जळगाव ः केळीचा पुरवठा वाढत असतानाच खानदेशात जाहीर दरापेक्षा १०० ते ३०० रुपये क्विंटलमागे कमी देऊन केळी उत्पादकांची सर्रास लूट सुरू झाली आहे. रोज कोट्यवधी रुपयांची लूट खानदेशात सुरू आहे. खरेदीदार, व्यापारी व बाजार समित्यांची मिलिभगत असल्याचा आरोप पुन्हा एकदा शेतकरी करीत असून, जिल्हा उपनिबंधक कार्यालय या प्रश्‍नी झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोपही केला जात आहे. 

जळगाव, चोपडा, रावेर, यावल, मुक्ताईनगर व पाचोरा-भडगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात केळीची कमी दरात खरेदी मागील महिनाभरापासून सुरू आहे. परंतु कुठेही या प्रकरणी कुठलीही बाजार समिती व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कारवाईसत्र राबविलेले नाही. 

केळीचा पुरवठा मुक्ताईनगर, रावेर भागात वाढला आहे. यावल, पाचोरा व जळगाव भागात अतिउष्णता व इतर कारणांमुळे काढणीयोग्य केळीला फटका बसला आहे. तसेच सुसाट वाऱ्यामुळे काही झाडे वाकल्याने घडांचे नुकसानही झाले आहे. हे नुकसान सहन करीत असतानाच पुन्हा एकदा कमी दरात केळी खरेदीचा प्रकार व्यापारी, खरेदीदारांनी सुरू केला आहे. 

रावेर बाजार समिती रोज दर जाहीर करते. परंतु दरांच्या अंमलबजावणीसाठी रावेर, जळगाव, चोपडा, पाचोरा-भडगाव, यावल, मुक्ताईनगर येथील बाजार समित्यांनी कुठलेही नियम, यंत्रणा राबविलेली नाही. केळीचे अनेक खरेदीदार, व्यापारी यांची बाजार समित्यांकडे नोंदणी नाही. इलेक्‍ट्रॉनिक काट्यावर केळीची शेतात तोलाई होत नसल्याच्यादेखील तक्रारी आहेत. सध्या काही शेतकऱ्यांच्या केळीची खरेदी चक्क ७०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल या दरात व्यापाऱ्यांनी थेट जागेवर केली आहे. दर ११०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक जाहीर झालेले असताना कमी दरात खरेदी कशी केली जाते? असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

केळीप्रश्‍नी शेतकऱ्यांचा आज मोर्चा
केळीला जाहीर दरांपेक्षा मिळणारे कमी दर, शेतकऱ्यांची झालेली फसवणूक व केळीसंबंधीच्या इतर प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता. १४) सकाळी १० वाजता रावेर (जि. जळगाव) येथे शेतकरी मोर्चा काढणार आहेत. रावेर शहरातील छोरिया मार्केटचे प्रवेशद्वार ते कृषी उत्पन्न बाजार समिती यादरम्यान हा मोर्चा निघेल. शेतकरी छोरिया मार्केटमध्ये सकाळी एकत्र येतील. यानंतर मोर्चा निघेल. रावेर व परिसरात केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदीचा प्रकार अनेक वर्षे सुरू आहे. शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची लूट मागील अनेक वर्षांत झाली. केळी उत्पादकांचे पैसेही अनेकांनी बुडविले. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मात्र दुर्लक्ष होत आहे. या प्रश्‍नाबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या; परंतु त्यासंबंधीची दखल घेतली नाही. यामुळे शेतकऱ्यांनाच पुढाकार घेऊन ही समस्या, प्रश्‍न दूर करण्याची वेळ आली आहे. यामुळे या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी हा शेतकरी धडक मोर्चा आयोजिण्यात आला आहे, असे मोर्चाच्या संयोजकांनी म्हटले आहे.


इतर अॅग्रो विशेष
सोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेतनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी...
गारठा पुन्हा वाढणारपुणे  ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून...
पूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळपुणे  ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन...
नाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या...नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी...
मराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेचऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने...
पंजाबचे पशुपालक वापरतात सुधारित तंत्रलुधियाना (पंजाब) येथे प्रोग्रेसिव्ह डेअरी...
शेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...