केळी दरांची अंमलबजावणी होईना

केळी दरांची अंमलबजावणी होईना
केळी दरांची अंमलबजावणी होईना

जळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव येताच दरांची अंमलबजावणीसंबंधीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. जे दर बाजार समित्या जाहीर करतात, त्यांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.   कांदेबाग केळीची काढणी अंतिम टप्प्यात येताच दरांवर दबाव आला. काही शेतकऱ्यांच्या बागांची काढणी ४० टक्‍क्‍यांवर राहिली आहे. केळीचे दर रावेर बाजार समिती जाहीर करीत आहे. सर्व भागांमध्ये रावेर बाजार समितीने जाहीर केलेल्या दरांनुसार खरेदी करणे बंधनकारक आहे. परंतु जे दर जाहीर होतात, त्यापेक्षा १०० ते १५० रुपये कमी दर चोपडा, जळगाव, जामनेर भागात दिले जात आहेत. फक्त बॉक्‍स पॅकिंगच्या केळीला जाहीर दरांएवढेच दर दिले जातात. सध्या थंडीचे प्रमाण अधिक असल्याने अनेक ठिकाणी कमी दर्जाची केळी येत आहे.  या केळीची खरेदी सुरवातीला व्यापारी टाळतात. केळी अधिक पक्व होताच ती मिळेल त्या दरात विक्रीशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नसतो. याचा लाभ खरेदीदार घेत आहेत. सध्या कांदेबाग केळीला ९६० रुपये प्रतिक्विंटल दर नवती केळीला १०२० रुपये दर आहे. परंतु एवढे दर रावेर, यावल वगळता इतरत्र मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. केळी उत्पादकांचे सध्या नुकसान होत आहे. जिल्ह्यात इतरत्र दुष्काळी स्थिती आहे. असे असतानाही दर अपेक्षित मिळत नसल्याने प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com