agriculture news in marathi, Banana rate high in Buranpur Market | Agrowon

केळीला बऱ्हाणपुरात २१०० रुपये उच्चांकी दर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

आमच्या भागात केळीची उपलब्धता पाच ते दहा टक्केही नाही. आता मार्चमध्येच कापणी जोमात होईल. नजीकच्या बऱ्हाणपुरातही केळीचा पुरवठा कमी आहे. आम्ही बऱ्हाणपुरातच केळीची अनेकदा विक्री करतो. तेथे सध्या दर्जेदार केळीला दर चांगले मिळत आहेत. 
- विशाल महाजन, केळी उत्पादक, नायगाव (जि. जळगाव)

जळगाव ः जिल्ह्यात केळीचे आगार असलेल्या रावेरात पुरवठा कमी झाल्याने केळीचे दर वधारले असून, शेतकऱ्यांना दर्जेदार केळीसंबंधी बऱ्यापैकी दर मिळत आहेत. कमी पुरवठ्याच्या परिणाम लगतच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात परिणाम झाला असून, तेथे दर्जेदार केळीला प्रतिक्विंटल २१०० रुपये दर मागील आठवडाभरापासून मिळत आहे. 

जळगाव जिल्ह्यातही निर्यातक्षम किंवा दर्जेदार केळीला जादा दरासह १४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहेत. बऱ्हाणपूर येथील बाजारात रावेर, मुक्ताईनगरसह बऱ्हाणपुरातील बहादरपूर, दापोरा, धाबे व तापी काठालगतच्या इतर गावांमधून केळीचा पुरवठा होतो. मागील महिन्यात हा पुरवठा प्रतिदिन २५० ट्रक (एक ट्रक १४५ मेट्रिक टन क्षमता) केळीचा पुरवठा होत होता. बऱ्हाणपुरात रोज जाहीर लिलाव होतात.

परंतु या महिन्यात जसा रावेर व मुक्ताईनगरमधून पुरवठा कमी झाला, तसा परिणाम बऱ्हाणपूरसह सावदा (ता.रावेर), फैजपूर (ता. यावल) येथील बाजारावर झाला. बऱ्हाणपूर येथे मागील पाच दिवसात प्रतिदिन फक्त ८० ट्रक केळीची आवक झाली आहे. दर्जेदार केळीला किंवा उच्च प्रतीच्या केळीला प्रतिक्विंटल २१०० रुपये तर कमी दर्जाच्या (वापसी) केळीला प्रतिक्विंटल ९०० रुपये दर तेथे मिळाले. 

जळगाव जिल्ह्यात सध्या फक्त चोपडा, जळगाव, जामनेर व पाचोरा-भडगावमधील काही भागातच केळीचा पुरवठा होत आहे. पिलबाग, जुनारी केळी बागांमधील केळीची काढणी जवळपास आटोपली आहे. जळगाव जिल्ह्यातही केळीचा पुरवठा निम्म्यावर आला असून, प्रतिदिन १८० ट्रक केळीचा पुरवठा होत आहे. मागील महिन्यात हा पुरवठा २५० ट्रक प्रतिदिनपर्यंत होता. १२४० रुपये प्रतिक्विंटलचे दर मागील तीन दिवसांपासून कायम आहेत. त्यावर क्विंटलमागे १५० ते २०० रुपये जादा दर मिळत असून, दर्जेदार केळीला थेट शेतात १४०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...