दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
ताज्या घडामोडी
बऱ्हाणपुरात केळीला २३०० रुपयांपर्यंत दर
जळगाव ः मध्य प्रदेशात केळीची काढणी जवळपास संपली आहे. परिणामी, बाजारातील आवक ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत निम्म्याने घटली असून, बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात केळीला लिलावात कमाल २३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर या आठवड्यात मिळाला आहे. दर्जेदार केळीची पाठवणूक या बाजारातून दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये होत आहे.
जळगाव ः मध्य प्रदेशात केळीची काढणी जवळपास संपली आहे. परिणामी, बाजारातील आवक ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत निम्म्याने घटली असून, बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात केळीला लिलावात कमाल २३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर या आठवड्यात मिळाला आहे. दर्जेदार केळीची पाठवणूक या बाजारातून दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये होत आहे.
दुर्गोत्सवामुळे सध्या केळीची उत्तर भारतात मागणी अधिक आहे. बऱ्हाणपूरचा बाजार केळीसाठी प्रसिद्ध आहे. या बाजारात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, यावल भागांतील अनेक शेतकरी केळी लिलावात विक्रीसाठी पाठवतात. ऑगस्टमध्ये या बाजारात केळीची प्रतिदिन आवक ४०० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) पर्यंत राहिली. सप्टेंबरमध्ये ही आवक कमी होऊ लागली. कारण, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरसह लगतच्या भागातील केळीची काढणी ऑगस्टअखेर जवळपास संपली. सप्टेंबरमध्ये यावल, रावेर व मुक्ताईनगरमधून या बाजारात केळीची पाठवणूक सुरू होती. परंतु सध्या यावल, रावेर व मुक्ताईनगरात काही पिलबाग वगळता केळी हवी तेवढी काढणीवर नाही. यामुळे बऱ्हाणपूरच्या बाजारात केळीची आवक निम्म्याने कमी होऊन ती २०० ते २५० ट्रकपर्यंत राहिली आहे.
या बाजारात दर्जेदार केळीला चांगले दर मिळत आहेत. तर कमी दर्जाच्या केळीला कमाल ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत. बऱ्हाणपूर येथील बाजारातील दरांबाबतच्या घडामोडींचा सकारात्मक प्रभाव जळगावच्या बाजारातही होत असून, जळगावच्या बाजारातील दर १६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. जळगाव जिल्ह्यात सध्या केळीची काढणी चोपडा, जळगाव व रावेरातील केऱ्हाळे, रसलपूर, धामोडी भागांत सुरू आहे.
या केळीची खरेदी फैजपूर (ता. यावल) व सावदा (ता. रावेर) येथील एजंट करीत असून, ही केळी बऱ्हाणपूर येथील मोठ्या खरेदीदारांच्या माध्यमातून उत्तरेकडे पाठविली जात आहे. केळीची आवक आणखी महिनाभर कमीच राहील. तर मागणीदेखील कायम राहील. कारण, हिवाळ्यात उत्तरेकडे अधिक उठाव असतो. यामुळे बऱ्हाणपूरसह जळगावच्या बाजारात दर टिकून राहतील, असा अंदाज केळी बाजाराचे जाणकार सुधाकर चव्हाण यांनी व्यक्त केला.
- 1 of 1023
- ››