खानदेशात केळी दरांवर दबाव

खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा दिवसांत वाढली आहे. परिणामी, दरांवर दबाव वाढला आहे. दरात क्विंटलमागे २० रुपयांची घसरण झाली असून, कमाल दर १२२० आणि किमान दर ७०० रुपयांवर आहेत.
खानदेशात केळी दरांवर दबाव
खानदेशात केळी दरांवर दबाव

जळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा दिवसांत वाढली आहे. परिणामी, दरांवर दबाव वाढला आहे. दरात क्विंटलमागे २० रुपयांची घसरण झाली असून, कमाल दर १२२० आणि किमान दर ७०० रुपयांवर आहेत.  अशातच जे दर बाजार समित्या केळीसाठी रोज जाहीर करीत आहेत, त्यापेक्षा १०० ते १५० रुपये कमी दरात केळीची खरेदी केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रावेर, जळगाव येथील बाजार समित्या केळीसाठी रोज दर जाहीर करतात. बाजार समित्या जे दर जाहीर करतात, त्याच दरात मात्र केळीची खरेदी केली जात नाही. दरांबाबत कुठलीही अंमलबजावणी बाजार समित्या, प्रशासन करीत नाही, असा आरोप मध्यंतरी शेतकऱ्यांनी केला.  तहसीलदार व इतर यंत्रणांकडे आपली कैफियत केळी उत्पादकांनी दरांबाबत मांडली. यानंतर प्रशासनाने केळीची जे दर जाहीर होतात, त्याच दरात खरेदी करण्याचे आदेश जारी केले. पण जळगाव, भडगाव-पाचोरा, यावल भागांत केळीची कमी दरात खरेदी सुरूच आहे. अनेक खरेदीदारांकडे परवाने नाहीत. यात फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचेही म्हणणे आहे.  केळीचे दर मध्यंतरी सुधारले. महिनाभरात तब्बल ८० ते ९० रुपयांनी दरात क्विंटलमागे सुधारणा झाली. परंतु जशी आवक वाढली, तसा दरांवरही दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे. काही भागांत ६०० रुपये प्रतिक्विंटल दरात कमी दर्जाच्या केळीची खरेदी केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. केळी दरात घसरण होत असल्याने किंवा कमी दरात खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांचे वित्तीय नुकसान होत आहे. आवक वाढतेय... गणेशोत्सव, सणासुदीचे दिवस येत आहेत. या काळात दर टिकून राहतील, असे सांगितले जात आहे. परंतु केळीची आवकही चोपडा, धुळ्यातील शिरपुरात वाढत आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला जळगाव, धुळ्यात प्रतिदिन १७५ ते १८० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक सुरू होती. सध्या ही आवक २३० ट्रकपेक्षा अधिक झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com