agriculture news in marathi Banana rate under pressure in Khandesh | Page 2 ||| Agrowon

खानदेशात केळी दरांवर दबाव

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 सप्टेंबर 2021

खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा दिवसांत वाढली आहे. परिणामी, दरांवर दबाव वाढला आहे. दरात क्विंटलमागे २० रुपयांची घसरण झाली असून, कमाल दर १२२० आणि किमान दर ७०० रुपयांवर आहेत. 

जळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा दिवसांत वाढली आहे. परिणामी, दरांवर दबाव वाढला आहे. दरात क्विंटलमागे २० रुपयांची घसरण झाली असून, कमाल दर १२२० आणि किमान दर ७०० रुपयांवर आहेत. 
अशातच जे दर बाजार समित्या केळीसाठी रोज जाहीर करीत आहेत, त्यापेक्षा १०० ते १५० रुपये कमी दरात केळीची खरेदी केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

रावेर, जळगाव येथील बाजार समित्या केळीसाठी रोज दर जाहीर करतात. बाजार समित्या जे दर जाहीर करतात, त्याच दरात मात्र केळीची खरेदी केली जात नाही. दरांबाबत कुठलीही अंमलबजावणी बाजार समित्या, प्रशासन करीत नाही, असा आरोप मध्यंतरी शेतकऱ्यांनी केला. 

तहसीलदार व इतर यंत्रणांकडे आपली कैफियत केळी उत्पादकांनी दरांबाबत मांडली. यानंतर प्रशासनाने केळीची जे दर जाहीर होतात, त्याच दरात खरेदी करण्याचे आदेश जारी केले. पण जळगाव, भडगाव-पाचोरा, यावल भागांत केळीची कमी दरात खरेदी सुरूच आहे. अनेक खरेदीदारांकडे परवाने नाहीत. यात फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचेही म्हणणे आहे. 

केळीचे दर मध्यंतरी सुधारले. महिनाभरात तब्बल ८० ते ९० रुपयांनी दरात क्विंटलमागे सुधारणा झाली. परंतु जशी आवक वाढली, तसा दरांवरही दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे. काही भागांत ६०० रुपये प्रतिक्विंटल दरात कमी दर्जाच्या केळीची खरेदी केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. केळी दरात घसरण होत असल्याने किंवा कमी दरात खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांचे वित्तीय नुकसान होत आहे.

आवक वाढतेय...
गणेशोत्सव, सणासुदीचे दिवस येत आहेत. या काळात दर टिकून राहतील, असे सांगितले जात आहे. परंतु केळीची आवकही चोपडा, धुळ्यातील शिरपुरात वाढत आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला जळगाव, धुळ्यात प्रतिदिन १७५ ते १८० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक सुरू होती. सध्या ही आवक २३० ट्रकपेक्षा अधिक झाली आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...