agriculture news in Marathi banana rate weak in Khandesh Maharashtra | Agrowon

खानदेशात केळीची कमी दरात खरेदी 

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 मे 2021

खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू झाली आहे. परंतु प्रचलित दरांच्या तुलनेत १०० ते २०० रुपये कमी दरात केळी खरेदीचा प्रकार चोपडा, यावल भागात सुरू आहे.

जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू झाली आहे. परंतु प्रचलित दरांच्या तुलनेत १०० ते २०० रुपये कमी दरात केळी खरेदीचा प्रकार चोपडा, यावल भागात सुरू आहे. कोरोना व लॉकडाउन अशा समस्या सांगून खरेदीदारांनी दर पाडल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. 

सध्या केळीची अधिक आवक यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर भागात सुरू आहे. परंतु कमी दर्जाच्या केळीचे कारण सांगून केळीची खरेदी प्रचलित दरांपेक्षा १०० ते २०० रुपये कमी दरात केली जात आहे. कमी दरात खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. खरेदीदार शेतकऱ्यांना केळीच्या काढणीचे आश्‍वासन देत आहेत. परंतु चार ते पाच दिवस उशीर काढणीला करतात. तोपर्यंत काढणीयोग्य केळी झाडांची उष्णता, वाऱ्याने पडझड होते. आणखी नुकसान होईल, या भीतीने शेतकरी कमी दरात काढणीला तयार होतात. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. 

केळीचे दर रावेर येथील बाजार समिती रोज जाहीर करीत आहे. परंतु जे दर होतात, त्यात खरेदी केली जाते की नाही, हा मुद्दा आहे. केळीची ९६ ते ९७ टक्के खरेदी थेट शेतात किंवा शिवार खरेदी केली जाते. या खरेदीवर बाजार समिती, प्रशासन किंवा जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक कार्यालयाचे नियंत्रण कुठेही नाही. हे नियंत्रण नसल्याने खरेदीदार मनमानी करीत आहेत. 

केळी नाशवंत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी करून कमी दरात खरेदीचा प्रकार सर्रास सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. केळी खरेदीदारांची नोंदणी, परवाने याचीदेखील तपासणी कुठे केली जात नाही. फक्त दर जाहीर करण्याचे काम बाजार समित्या करतात, अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यात अनेकदा खरेदीदार केळी काढणीनंतर शेतकऱ्यांची फसवणूकही करीत आहेत, असेही सांगण्यात आले. 

शेतकऱ्यांना आर्थिक फटका 
सध्या केळीचे दर ११०० ते १३५० रुपये, एवढे जाहीर होत आहेत. परंतु चोपड्यातील तापी काठानजीकच्या भागात केळीची काढणी ८०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल या दरात केली जात आहे. जळगाव तालुक्यातही काही शेतकऱ्यांची नवती केळी काढणीवर आहे, या भागातही कमी दरात केळीची खरेदी करण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे जे दर जाहीर होत आहेत, त्यातच खरेदीची सक्ती व्यापारी, खरेदीदारांना करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी...
पूर्वविदर्भात जोरदार पाऊस पुणे : राज्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच...
जालन्यातील ऊस संशोधन केंद्र उभारणीला...पुणे ः ऊस शेतीच्या विकासासाठी विदर्भ,...
दूध दरांसाठी ग्रामसभांच्या ठरावाची...नगर : राज्यात दुधाला दर दिला जात नसल्याने दूध...
आता शेतकरीच करणार पीकपाहणी पुणे ः तलाठ्याकडून गावशिवारात प्रत्यक्ष पाहणी...