मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी शेतकऱ्यांचे मन
ताज्या घडामोडी
नवती केळी दरात सुधारणा
जळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधारणा झाली असून, दर १२४० रुपये क्विंटलपर्यंत पोचले आहेत. रावेरात केळीची आवक काहीशी कमी झाली असतानाच उत्तर भारतातून उठाव कायम आहे.
जळगाव ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधारणा झाली असून, दर १२४० रुपये क्विंटलपर्यंत पोचले आहेत. रावेरात केळीची आवक काहीशी कमी झाली असतानाच उत्तर भारतातून उठाव कायम आहे.
जूनमध्ये केळीचे दर दबावात होते. उठाव कमी होता. यामुळे जाहीर दरांच्या तुलनेत २०० ते ३०० रुपये कमी देऊन यावल, पाचोरा, जामनेर भागांत केळी खरेदी केली जात होती. उष्णतेमुळे केळीचा दर्जाही खालावला होता. या महिन्यात पावसानंतर केळीचा दर्जा सुधारला असून, उत्तर भारतातून मागणी कायम आहे. यातच जुलै महिन्यात रावेरातील तापी काठ व मध्य रावेरात लागवड केलेल्या केळी बागांमधील काढणी पूर्ण झाली आहे.
सध्या रावेरमधील केऱ्हाळे, रसलपूर, ऐनपूर, धामोडी भागांत केळीची काढणी सुरू आहे. यावल व मुक्ताईनगर भागांतील केळीची काढणीही पूर्ण होत आली आहे. केळीची आवक मागील आठवड्यात कमी होऊन ती प्रतिदिन २८५ ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) एवढी राहिली. यामुळे केळीच्या दरात सुधारणा झाली आहे. उत्तर भारतासह राज्यातील पुणे, कल्याण, ठाणे, नागपूर येथून केळीला बऱ्यापैकी मागणी आहे. सावदा (ता. रावेर) व फैजपूर (ता. यावल) येथील मध्यस्थ उत्तर भारतात बॉक्समध्ये पॅकिंग करून केळी पाठवत आहेत.
खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, तळोदा व शहादा भागांतही केळीची काढणी जवळपास पूर्ण झाली आहे. शहादामधील ब्राह्मणपुरी, सुलतानपूर, तळोदामधील मोड, आमलाड, बोरद भागांत दर्जेदार केळी कमी उपलब्ध आहे. ब्राह्मणपुरी येथील केळीची काढणी ९० टक्के आटोपल्याने तेथील मध्यस्थांद्वारे होणारी आखातातील केळीची निर्यात बंद झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेरलगत असलेल्या बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात केळीची आवक सुमारे ३० ते ३५ ट्रकने कमी झाली. तेथे दर्जेदार केळीला रविवारी (ता. १४) १४०० रुपये क्विंटल दर मिळाला. पिलबाग केळीला ११३० रुपये क्विंटल तर कमी दर्जाच्या केळीला ७७० रुपये क्विंटल दर मिळाला. जळगाव जिल्ह्यात सध्या चोपडा, जळगाव तालुक्यांत केळीची काढणी सुरू नाही. या भागातील कांदेबाग केळीची काढणी दिवाळी सणाला सुरू होईल. ही सगळी स्थिती लक्षात घेता केळी दर टिकून राहतील, असे सांगितले जात आहे.
- 1 of 580
- ››