agriculture news in marathi, banana rates increase, jalgaon, maharashtra | Page 3 ||| Agrowon

नवती केळी दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जुलै 2019

जळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधारणा झाली असून, दर १२४० रुपये क्विंटलपर्यंत पोचले आहेत. रावेरात केळीची आवक काहीशी कमी झाली असतानाच उत्तर भारतातून उठाव कायम आहे. 

जळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे ५० रुपयांनी सुधारणा झाली असून, दर १२४० रुपये क्विंटलपर्यंत पोचले आहेत. रावेरात केळीची आवक काहीशी कमी झाली असतानाच उत्तर भारतातून उठाव कायम आहे. 

जूनमध्ये केळीचे दर दबावात होते. उठाव कमी होता. यामुळे जाहीर दरांच्या तुलनेत २०० ते ३०० रुपये कमी देऊन यावल, पाचोरा, जामनेर भागांत केळी खरेदी केली जात होती. उष्णतेमुळे केळीचा दर्जाही खालावला होता. या महिन्यात पावसानंतर केळीचा दर्जा सुधारला असून, उत्तर भारतातून मागणी कायम आहे. यातच जुलै महिन्यात रावेरातील तापी काठ व मध्य रावेरात लागवड केलेल्या केळी बागांमधील काढणी पूर्ण झाली आहे.

सध्या रावेरमधील केऱ्हाळे, रसलपूर, ऐनपूर, धामोडी भागांत केळीची काढणी सुरू आहे. यावल व मुक्ताईनगर भागांतील केळीची काढणीही पूर्ण होत आली आहे. केळीची आवक मागील आठवड्यात कमी होऊन ती प्रतिदिन २८५ ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) एवढी राहिली. यामुळे केळीच्या दरात सुधारणा झाली आहे. उत्तर भारतासह राज्यातील पुणे, कल्याण, ठाणे, नागपूर येथून केळीला बऱ्यापैकी मागणी आहे. सावदा (ता. रावेर) व फैजपूर (ता. यावल) येथील मध्यस्थ उत्तर भारतात बॉक्‍समध्ये पॅकिंग करून केळी पाठवत आहेत. 

खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, तळोदा व शहादा भागांतही केळीची काढणी जवळपास पूर्ण झाली आहे. शहादामधील ब्राह्मणपुरी, सुलतानपूर, तळोदामधील मोड, आमलाड, बोरद भागांत दर्जेदार केळी कमी उपलब्ध आहे. ब्राह्मणपुरी येथील केळीची काढणी ९० टक्के आटोपल्याने तेथील मध्यस्थांद्वारे होणारी आखातातील केळीची निर्यात बंद झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेरलगत असलेल्या बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात केळीची आवक सुमारे ३० ते ३५ ट्रकने कमी झाली. तेथे दर्जेदार केळीला रविवारी (ता. १४) १४०० रुपये क्विंटल दर मिळाला. पिलबाग केळीला ११३० रुपये क्विंटल तर कमी दर्जाच्या केळीला ७७० रुपये क्विंटल दर मिळाला.  जळगाव जिल्ह्यात सध्या चोपडा, जळगाव तालुक्‍यांत केळीची काढणी सुरू नाही. या भागातील कांदेबाग केळीची काढणी दिवाळी सणाला सुरू होईल. ही सगळी स्थिती लक्षात घेता केळी दर टिकून राहतील, असे सांगितले जात आहे.


इतर बातम्या
नामंजूर वनहक्क दाव्यांसंदर्भात विभागीय...मुंबई  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी...
पुणे जिल्ह्यात खरिपासाठी १ लाख १९ हजार...पुणे  ः खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १४...पुणे  : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव झाल्यानंतर...
प्रत्यक्ष खर्चाचे आणि कर्जाचे पॅकेज...मुंबई : पात्र नसणाऱ्या आणि उचल न घेतलेल्या...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
चिखलगावच्या जिनिंगमध्ये कापसाला भीषण आग...अकोला ः येथील पातूर मार्गावर चिखलगाव जवळ असलेल्या...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
सांगा साहेब, खरीप कसा पेरू? शेतकऱ्याने...नाशिक : मागील खरिपाच्या हंगामात अतिवृष्टीची...
जैविक शेती मिशनद्वारे यूट्यूब चॅनलच्या...अमरावती ः कमी खर्चाच्या जैविक शेतीला प्रोत्साहन...
म्हैसाळ योजनेतून तलाव भरून देण्याची...सांगली ः म्हैसाळ उपसा योजना सुरू होऊन महिन्याचा...
बुलडाण्यात पीकविमा बचत खात्यात जमा...बुलडाणा ः जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा पीकविमा...
समृद्धी महामार्गाच्या धुळीमुळे नुकसान...कारंजालाड, जि. वाशीम : समृद्धी महामार्गाच्या...
मका पिकाची हेक्टरी उत्पादकता वाढवा ः...बुलडाणा ः शासनाने यावर्षी पाऊस चांगला असताना...
अमरावती : पीककर्जाच्या व्याज माफीचा...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
जळगावात ज्वारी खरेदीसाठी स्वस्त धान्य...जळगाव : जिल्ह्यात भरडधान्याच्या साठवणुकीसाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जासाठी ऑनलाइन मागणी...औरंगाबाद : ‘‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या...
केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या...नाशिक : केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर...
परभणीत उद्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी परभणी  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जालना जिल्ह्यात नोंदणीकृत शेतकऱ्यांकडील...जालना : जिल्ह्यातील विविध बाजार समितींकडे...