agriculture news in marathi Banana selling rate under pressure in Khandesh | Agrowon

केळी दरांवर दबाव वाढताच

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 नोव्हेंबर 2021

खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे. किमान दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. ऐन दिवाळीत दरांवर दबाव वाढल्याने शेतकऱ्यांना वित्तीय फटका बसत आहे.

जळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे. किमान दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. ऐन दिवाळीत दरांवर दबाव वाढल्याने शेतकऱ्यांना वित्तीय फटका बसत आहे. व्यापाऱ्यांनी एकी करून दर पाडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. 

दर्जेदार केळीची खरेदी १०००, ११०० ते १२५० रुपये प्रतिक्विंटल, या दरात काही भागात केली जात आहे. पण अपवादानेच एवढा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. दर्जा कमी असल्याचे कारण खरेदीदार सांगत आहेत. यातच केळीची आवकदेखील मागील आठ ते १० दिवसांत आणखी वाढली आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या बाजारातही केळी दरांवर दबाव आहे. तेथे केळीची गेले चार दिवस प्रतिदिन १५४ ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) आवक झाली आहे. कमाल दर ११८० व किमान दर ७०० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला आहे. 

खानदेशात धुळे, जळगाव जिल्ह्यात मिळून सध्या २४० ट्रक केळीची आवक होत आहे. आवकेत वाढ होत आहे. सध्या कांदेबाग केळीची काढणी जळगाव जिल्ह्यात अधिकची होत आहे. चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा-भडगाव, धुळ्यातील शिरपुरात केळीची काढणी अधिकची होत आहे. याच भागात कमी दरात केळी खरेदीच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत. 

केळी काढणीसाठी खरेदीदारांच्या विनवण्या कराव्या लागत आहेत. खरेदीनंतर १० ते १२ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. उधारीवर व्यवहार सुरू असल्याने नुकसान, फसवणुकीची भीतीही वाढली आहे. मध्यंतरी चोपडा, जळगाव आदी भागांतील शेतकऱ्यांनी हा प्रश्‍न जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे मांडला होता. पण त्यावर व्यवस्थित तोडगा निघालाच नाही. यामुळे केळीची ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी केली जात आहे, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

केळीचे दर रावेर बाजार समिती जाहीर करते, पण जे दर जाहीर होत आहेत, त्या दरात खरेदी का केली जात नाही, यावर जिल्हा उपनिबंधक किंवा इतर कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. कुण्या व्यापाऱ्यावर कारवाई याबाबत झाली नाही, असा मुद्दाही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.


इतर बाजारभाव बातम्या
गेवराईतील बाजारात तीळ, मटकीला वाढीव दरगेवराई, जि. बीड : गेवराई कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरचीला ५५०० रुपये दरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कळमणात तूर हमीदराखालीनागपूर ः तुरीच्या दरात गेल्या आठवड्यात चांगली...
नगरमध्ये भाजीपाला दरात सुधारणा कायमनागपूर  नगर ः नगर येथील दादा पाटील...
काकडीच्या दरात सुधारणा, फळभाज्यांचे दर...पुणे : मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव - कारंजा बाजार समितीत आज...
Top 5 News: खाद्यतेल बाजाराची...1. सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी...
राज्यात हिरवी मिरची १२०० ते ६५०० रुपयेपरभणीत ४००० ते ६५०० रुपये परभणी ः येथील पाथरी...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
Top 5 News: हरभरा पेरणीत आता महाराष्ट्र...1. उत्तर महाराष्ट्रात सध्या सकाळी धुक्याची दाट...
जालन्यात हिरवी मिरची, गवार,...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
लाल कांद्याच्या दरात नाशिकमध्ये सुधारणानाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कांद्याची विक्रमी आवक; दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरला वांगी, शेवगा, गवारीचे दर टिकून​ नगर  : नगर येथील दादा पाटील...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज मानवत बाजारात...
रब्बीचा पेरा : कडधान्य स्थिर; तर...पुणे - यंदा देशात रब्बी पिकांच्या पेरणीत (Rabbi...
पुण्यात सिमला, हिरवी मिरचीच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
लातूरमध्ये वांगी सरासरी १६०० रुपये...लातूर : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१५)...
राज्यात काकडी ५०० ते ३००० रुपयेसांगलीत क्विंटलला १००० ते १५०० रुपये सांगली ः...
कापूस बाजार मजबूत राहणारफॉरेन अॅग्रिकल्चरल सर्विसेस ही अमेरिकेच्या कृषी...