आंदोलनामुळे पंजाब, काश्मिरातील केळीची वाहतूक ठप्प

खानदेशात कांदेबाग केळीची काढणी पूर्ण होत आली आहे. केळीची आवक कमी आहे.
banana
banana

जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची काढणी पूर्ण होत आली आहे. केळीची आवक कमी आहे. यातच दिल्ली येथील शेतकरी आंदोलनामुळे पंजाब व काश्मिरातील केळीची पाठवणूक, उठाव कमी झाल्याने बॉक्समध्ये पॅकींगच्या केळीची मागणी घटली आहे.  केळी दरांवर दबाव आहे. केळीचे दर गेल्या आठवड्यापर्यंत टिकून होते. किमान ७९० व कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटलचे दर केळीला मिळत होते. परंतु गेल्या आठवड्याच्या मध्यानंतर पंजाब, जम्मू-काश्मीरमधून केळीची मागणी कमी होत गेली. तेथे मॉल्स, सुपर शॉपमध्ये १६ किलो क्षमतेच्या बॉक्समध्ये पॅकिंग केलेल्या केळीची मागणी असते. जिल्ह्यातून दर आठवड्याला पंजाब, काश्मीर भागात किमान २०० ते २५० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची पाठवणूक होत होती. परंतु ही पाठवणूक गेल्या आठवड्यात हळूहळू कमी झाली. दिल्ली येथील आंदोलनात अनेक खरेदीदार सहभागी झाले आहेत. तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. स्थिती तणावाची असल्याने पंजाबमधील केळी पिकवणी केंद्रचालक केळीची उचल करीत नसल्याची स्थिती आहे.  उठाव कमी झाला पंजाबच्या प्रमुख शहरांसह मुख्य बाजाराच्या गावांमध्ये पणन व्यवस्थेला फटका बसला आहे. यामुळे केळीचा उठाव कमी होत गेला. याचा परिणाम जम्मू येथेही दिसत आहे. यामुळे केळीची आवक खानदेशात कमी असताना दरांवर परिणाम झाला आहे. बॉक्समध्ये पाठवणुकीची केळी वाहतूक जवळपास २० टक्क्यांवर आली आहे. दर्जेदार केळीलाही खानदेशात सध्या कमाल ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. गेल्या चार-पाच दिवसांत हा परिणाम अधिक झाला आहे.

केळी आवक कमी होण्याची शक्यता खानदेशात सध्या जळगाव, चोपडा, शिरपूर, पाचोरा या भागात रोज १३० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची काढणी किंवा आवक सुरू आहे. ही आवक पुढील आठवड्यात आणखी कमी होईल, अशी माहिती केळी व्यापाराचे जाणकार सुधाकर चव्हाण यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com