राज्यात केळी ५५० ते १५०० रुपये क्विंटल

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ११) केळीची आवक २७० क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८५० ते १५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
Bananas cost Rs 550 to Rs 1,500 per quintal in the state
Bananas cost Rs 550 to Rs 1,500 per quintal in the state

नाशिकमध्ये क्विंटलला ८५० ते १५०० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ११) केळीची आवक २७० क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८५० ते १५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता. १०) आवक २१० क्विंटल झाली. तिला ८५० ते १५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० रुपये राहिला. सोमवारी (ता. ९) आवक २८० क्विंटल झाली. तिला ८५० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० रुपये राहिला. रविवारी (ता. ८) फळ बाजार बंद असल्याने केळीची आवक झाली नाही.    

शनिवारी (ता. ७) आवक १६० क्विंटल झाली. तीला ८०० ते १२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० रुपये राहिला. शुक्रवारी (ता.६) आवक १७० क्विंटल झाली. त्या वेळी १००० ते १५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० रुपये राहिला. गुरुवारी (ता.५) केळीची आवक झाली नव्हती. सप्ताहाच्या सुरवातीला आवक स्थिर होती. मात्र नंतर ती ती वाढत गेल्याचे दिसून आले. दर स्थिर राहिले.

परभणीत प्रतिक्विंटलला १००० ते १२०० रुपये

परभणी ः जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी थेट शेतातूनच केळीची विक्री करतात. त्यामुळे फळे मार्केटमध्ये तुलनेने कमी आवक असते. गेल्या महिनाभरापासून केळीच्या फारशी सुधारणा नाही. सध्या प्रतिक्विंटल कमाल १००० ते  किमान १२०० रुपये, तर सरासरी ११०० रुपये दर आहेत, असे मार्केटमधील सूत्रांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील व्यापारी तसेच स्थानिक परिसरातील बहुतांश व्यापाऱ्याकडून थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन केळीची खरेदी करतात. त्यामुळे येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये दररोज आवक नसते. आठवड्यातील एक दोन दिवस आड ३० ते ४० क्विंटल केळीची आवक होते. गेल्या महिनाभरापासून केळीचे दर प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दरम्यान आहेत. गुरुवारी (ता.१२) स्थानिक बाजारात पिकविलेल्या केळीची किरकोळ विक्री ३० ते ४० रुपये डझन प्रमाणे सुरु होती, असे व्यापारी इब्राहिम बागवान यांनी सांगितले.

नांदेडला प्रतिक्विंटलला ११०० ते १३०० रुपये  

नांदेड : ‘‘नांदेड जवळील अर्धापूर बाजारात सध्या केळीला ११०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. ही केळी देशातील इतर राज्यासह आखातामध्ये निर्यात होत आहे,’’ अशी माहिती केळीचे व्यापारी नीलेश देशमुख बारडकर यांनी दिली.  

नांदेड जिल्ह्यात सध्या केळीच्या दरात स्थिरता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दर चांगले मिळत आहेत. मागील दोन महिन्यापासून केळीच्या दरात तेजी आहे. नांदेड शहराजवळील अर्धापूर केळी मार्केटमध्ये सध्या दररोज २ ते ३ हजार टन केळीची आवक होत आहे.  ही केळी अरब राष्ट्रामधील आठ ते दहा देशांमध्ये निर्यात होत आहे. या सोबतच देशाच्या विविध भागांसह दिल्ली, चंडीगड या भागात सध्या विक्री होत आहे. गुरुवारी (ता. १२) अर्धापूर बाजारात दोन हजार टन केळीचे आवक झाली. यास ११०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

अकोल्यात क्विंटलला १०५० रुपयांचा दर

अकोला ः  जिल्ह्यात केळीला पांढरी बोर्डानुसार गुरुवारी (ता.१२) १०५० रुपयांचा दर मिळाला. मागील दहा दिवस सरासरी १०२५ रुपयांचा दर मिळत होता. त्यात २५ रुपयांची वाढ दिसून आली.

जिल्ह्यात अकोट, तेल्हारा तालुक्यात असलेल्या केळीची प्रामुख्याने विक्री पांढरी बोर्डाच्या दरानुसार होत आहे. व्यापारी हा दर मान्य करीत शेतकऱ्यांच्या केळीची खरेदी करतात. गेले काही दिवस केळीला चांगला दर मिळत आहे. सध्या मागील वर्षात ज्यांनी जुलै-ऑगस्टमध्ये लागवड केली होती. अशांच्या बागांमधील केळी निघत आहे. जुनमध्ये लागवड केलेल्या बागांमधील माल काढून झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. १०५० रुपयांचा दर परवडणारा असल्याचेही शेतकरी बोलत आहेत.

दुय्यम (सेकंड) दर्जाचा माल निघाल्यास त्याला अर्धाच दर मिळत आहे. आगामी सणासुदीच्या काळात केळीचे दर आणखी चांगले मिळू शकतात, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

नगरला प्रतिक्विंटलला ६०० ते ७०० रुपये

नगरः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीची दर दिवसाला ६ ते ८ क्विटंलची आवक होत आहे. गुरुवारी (ता.१२) केळीला प्रतिक्विंटल ६०० ते ७०० रुपये व सरासरी ६५० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले  

नगर बाजार समितीत केळीची आवक वाढू लागली आहे. मंगळवारी (ता. १०) केळीची ७ क्विटंलची आवक होऊन ६०० ते ७०० रुपये व सरासरी ६५० रुपयांचा दर मिळाला. सोमवारी (ता. ९) केळीची ५ क्विंटलची आवक झाली. ६०० ते ७०० व सरासरी ६५० रुपयांचा दर मिळाला.  गुरुवारी (ता. ५) रोजी ८ क्विंटलची आवक होऊन ६०० ते ८०० रुपये व सरासरी ७०० रुपयांचा दर मिळाला.

मंगळवारी (ता. ३) ५ क्विंटलची आवक झाली. दर ७०० ते ८०० रुपये व सरासरी ७५० रुपये मिळाला. नगर बाजार समितीत गेल्या  काही दिवसांपासून केळीचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

जळगावात प्रतिक्विंटलला १२२० ते ७०० रुपये

जळगाव ः जिल्ह्यात बाजार समितीत केळीची अपवादानेच आवक होते. ९५ टक्के केळीची खरेदी थेट शिवारात किंवा जागेवर व्यापारी, खरेदीदार करतात. सध्या जिल्ह्यात चोपडा, पाचोरा-भडगाव, जळगाव आदी भागात आगाप कांदेबाग केळीची काढणी सुरू आहे. दर किमान ७०० ते कमाल १२२०, तर सरासरी ९०० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळत आहे. 

कांदेबाग केळी दर्जेदार आहे. या केळीची पाठवणूक उत्तर भारतात पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेश आदी भागात होत आहे. सध्या किंवा गेल्या २० - २५ दिवसांत केळीची आवक कमी झाली आहे. गेले १५ दिवस प्रतिदिन सरासरी १६५ ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक झाली. केळीच्या दरात गेल्या २० दिवसात सुधारणा झाली आहे. 

जूनच्या अखेरीस दर १००० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल होते. पण जशी आवक कमी झाली. तशी दरातही हळूहळू सुधारणा दिसत आहे. पुढील १५ दिवस आवक वाढणार नाही. पण सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कांदेबाग केळीची काढणी वेग घेईल. या वेळेस आवक वाढू शकते. केळीची उठावही चांगला असल्याची माहिती मिळाली.

पुण्यात प्रतिक्विंटलला १००० ते १२०० रुपये

पुणे ः ‘‘गुलटेकडी येथील केळी बाजारात गुरुवारी (ता. १२) केळीची सुमारे १०० टन आवक झाली होती. यावेळी प्रतिकिलोला १० ते १२ रुपये दर राहिला. सध्या आवक आणि दर संतुलित आहे’’, असे आडतदार राजू जाधव यांनी सांगितले. 

‘‘बाजार समितीमध्ये होणारी आवक ही प्रामुख्याने अकलूज आणि इंदापूर तालुक्यांमधून होत आहे. कोरोनाचे निर्बंध उठवल्यामुळे किरकोळ बाजारातून मागणी वाढली आहे. त्यामुळे दर १० ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे’’, असे जाधव यांनी सांगितले.

सोलापुरात प्रतिक्विंटलला ५५० ते १००० रुपये

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात केळीला चांगली मागणी राहिली. केळीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १००० रुपये इतका दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात केळीची आवक रोज १० ते २० गाड्यांपर्यंत राहिली. केळीची आवक अकलूज, माढा, करमाळा या स्थानिक भागातून झाली. गेल्या काही दिवसांपासून त्याला मागणीही आहे.  सध्या श्रावण महिन्यामुळे मागणीत आणखी वाढ होणार आहे.

केळीला प्रतिक्विंटलला किमान ५५० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही दर आणि आवकेची स्थिती अशीच होती. प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक ९०० रुपये इतका दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com