agriculture news in marathi Bananas cost Rs 600 to Rs 1,500 in the state | Agrowon

राज्यात केळी ६०० ते १५०० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 जुलै 2021

सांगली : जिल्ह्यातील वाळवा, इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आष्टा येथील दुय्यम बाजार आवारात केळीची आवक कमी, अधिक होत आहे.

सांगलीत क्विंटलला १२५० ते १३५० रुपये 

सांगली : जिल्ह्यातील वाळवा, इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आष्टा येथील दुय्यम बाजार आवारात केळीची आवक कमी, अधिक होत आहे. गुरुवारी (ता. ८) केळीची २.५ टन आवक झाली. त्यास प्रतिटन १२५०० ते १३५००, तर सरासरी १२५०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार आवारात वाळवा तालुक्यातून आवक होते. सोमवारी (ता.२८) केळीची १.५ टन आवक झाली. त्यास प्रतिटन ११५०० ते १२५००, तर सरासरी १२००० असा दर होता. गुरुवारी (ता. १ ) केळीची १.६ टन आवक झाली. त्यास प्रतिटन ९५०० ते १०१००, तर सरासरी ९५०० रुपये असा दर होता. बाजार समितीमध्ये आठवड्यातून दोन वेळा सौदे होतात.

नगरमध्ये प्रतिक्विंटल ६०० ते ८०० रुपये दर

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीची दर दिवसाला ६ ते १० क्विंटल आवक होत आहे. केळीला ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून केळीच्या आवकेत आणि दरातही सतत चढउतार होत आहेत.

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून केळीची आवक वाढत आहे. नगरसह सोलापूर, बीड भागातून येथे केळी विक्रीसाठी येत आहे. रविवारी (ता. ४) तीन क्विंटलची आवक झाली. त्यास ६०० ते ७०० व सरासरी ६५० रुपयांचा दर मिळाला. २६ जून रोजी ६ क्विंटलची आवक होऊन ७०० ते ८०० व सरासरी ७५० रुपयांचा दर मिळाला. २४ जून रोजी ४ क्विंटलची आवक झाली. तर ७०० ते ८०० व सरासरी ७५० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

जळगावात प्रतिक्विंटलला ७०० ते ११०० रुपये दर

जळगाव :  जिल्ह्यात ९५ टक्के केळीची खरेदी थेट जागेवर किंवा खेडा खरेदी केली जाते. गेल्या महिनाभरापासून आवक टिकून आहे. प्रतिदिन सरासरी १८० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. दर गेल्या आठवडाभरापासून ७०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल आहे. 

वापसी किंवा कमी दर्जाच्या केळीचे दर ६५० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. सध्या नवती केळीची काढणी सुरू आहे. रावेर तालुक्यात अधिक आवक होत आहे. या पाठोपाठ यावल, मुक्ताईनगर भागात आवक सुरू आहे. रावेर व मुक्ताईनगरच्या सीमेवरील मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही केळीची प्रतिदिन १६० ट्रक आवक गेल्या आठवडाभरापासून होत आहे.

आवक टिकून आहे, पण काही शेतकऱ्यांना कमी दर्जाची केळी सांगून कमी दर दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत. केळीची साठवणूक जिल्ह्यातून उत्तर भारतात दिल्ली, पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेशात केली जात आहे. उठाव बऱ्यापैकी असल्याचे सांगण्यात आले.

नाशिकमध्ये क्विंटलला १००० ते १५०० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ७) केळीची आवक १६० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

केळीची मंगळवारी (ता. ६) आवक १२० क्विंटल झाली. तिला ८५० ते १५०० रुपये, तर सर्वसाधारण दर १२५० रुपये राहिला. सोमवारी (ता.५)  आवक २६० क्विंटल झाली. त्या वेळी ८५० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० राहिला. रविवारी (ता.४) फळ बाजार बंद असल्याने केळीची आवक झाली नाही. शनिवारी (ता.३) आवक २२० क्विंटल झाली. त्यावेळी ८५० ते १५००, तर सर्वसाधारण दर १२५० रुपये राहिला. 

शुक्रवारी (ता.२) आवक १७० क्विंटल झाली. त्या वेळी १००० ते १५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० राहिला. गुरुवारी (ता.१) केळीची आवक २१० क्विंटल झाली. ८५० ते १२५०, तर सर्वसाधारण १००० रुपये दर राहिला. 

सप्ताहाच्या सुरवातीला आवक स्थिर होती. मात्र ती नंतर कमी झाली. दरम्यान आवक व मागणीप्रमाणे दरात चढ-उतार दिसून आला.

नांदेडमध्ये क्विंटलला ११०० ते १३०० रुपये

नांदेड : जिल्ह्यातील केळीला सध्या ११०० ते १३०० रुपये दर मिळत आहे. दररोज दोन हजार टन केळीची आवक अर्धापूर मार्केटमध्ये होत आहे. ही केळी अरब राष्ट्रात दररोज १०० ते १५० टन, ६०० ते ७०० टन उत्तर भारतात, तर इतर केळी स्थानिक बाजारात जात असल्याची माहिती केळी निर्यातदार नीलेश देशमुख यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, मुदखेड, नांदेड, भोकर, उमरी या तालुक्यात केळीचे पीक घेतले जाते. या सोबत नांदेड जिल्ह्यात शेजारी असलेल्या परभणीमधील पूर्णा व हिंगोली, वसमत, कळमनुरी तालुक्यात केळी घेतली जाते. या तालुक्यातील शेतकऱ्यांची केळी अर्धापूर बाजारात आवक होते. सध्या दररोज २००० टन केळीची आवक होत आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

कोल्हापुरात क्विंटलला १२०० ते १४०० रुपये

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून केळीच्या दरात वाढ होत आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे केळीचा उठाव कमी झाला. या मुळे केळीची लागवड कमी झाली. याचा परिणाम यंदा दिसत आहे.  बाजारात केळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे दररोज केळीचे दर वाढत आहेत. सध्या केळीस क्विंटलला १२०० ते १४०० रुपये दर मिळत आहेत.

पंधरवड्यापूर्वी  ८०० ते ९०० रुपये इतका दर होता. स्थानिक बाजारात हव्या त्या प्रमाणात केळी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक व्यापारी जिल्ह्याबाहेरून केळी मागवित आहेत. त्यामुळे केळीच्या दरात वाढ कायम आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

येत्या काही महिन्यात अनेक सण आहेत. या काळात केळीला मागणी वाढणार आहे. त्यामुळे केळीच्या दरात वाढ होईल, अशी शक्‍यता सूत्रांनी व्यक्त 
केली.

अकोल्यात क्विंटलला १००० रुपये दर

अकोला ः जिल्ह्यात केळीला सध्या हजार रुपयांवर प्रतिक्विंटलला दर मिळत आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी तालुक्यात केळीचे क्षेत्र आहे. अकोट तालुक्यात केळीचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. त्या भागात पांढरी बोर्डाच्या दराने व्यापारी खरेदी करीत असतात. सध्या दरात चांगली तेजी असल्याचे सांगण्यात आले. 

कोरोनाच्या काळात शासनाने लॉकडाऊन जाहीर करताच केळीचे दर ५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. लॉकडाऊन सुरु असेपर्यंत हेच दर मिळत होते. आता अनलॉक झाल्यानंतर इतर राज्यात केळीची वाहतूक सुरु झाली. तसेच मागणीही वाढली. यामुळे केळीच्या दरात सुधारणा झाली. अकोला जिल्ह्यात पांढरी बोर्डानुसार गेल्या आठ दिवसांपासून १०२५ रुपयांचा दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. अकोला बाजारात केळीची किरकोळ विक्री ३० ते ४० रुपये डझन दराने केली जात आहे.

परभणीत प्रतिक्विंटलला १००० ते ११०० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये सध्या दररोज १० ते २० क्विंटल केळीची आवक होत आहे. केळीला प्रतिक्विंटल किमान १००० ते कमाल ११०० रुपये, तर सरासरी १०५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील बहुतांश व्यापाऱ्याकडून थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन केळीची खरेदी केली जाते. त्यामुळे मार्केटमधील केळीची आवक तुलनेने कमी असते. सध्या स्थानिक परिसरातून दररोज १ ते २ टन केळीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरात केळीचे दर प्रतिक्विंटल ५०० ते ७०० रुपये होते.

यंदाच्या हंगामातील नवीन केळीचा काढणी हंगाम नुकताच सुरु झाला आहे. परंतु आवक कमी आहे. त्यामुळे दर प्रतिक्विंटल १००० ते ११०० रुपये पर्यंत वाढले आहेत. गुरुवारी (ता. ८) स्थानिक बाजारात पिकविलेल्या केळीची किरकोळ विक्री ३० ते ५० रुपये डझन प्रमाणे सुरु होती, असे व्यापारी इब्राहिम बागवान यांनी सांगितले.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
राज्यात मूग ४००० ते ८५०० रुपये क्विंटललातुरात सरासरी ६५०० ते ६८२० रुपये  लातूर :...
औरंगाबादमध्ये बटाटे स्थिर, वांगी, मिरची...औरंगाबादमध्ये : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक, दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये उडदाला ५००० ते ६८०० रुपयेनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात उडीद, मुगाला उठाव, दरही तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
शेतमाल आवक वाढली, मागणी घटली, दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...