agriculture news in marathi Bananas flourish in Khandesh | Agrowon

खानदेशात कांदेबाग केळी जोमात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जानेवारी 2021

जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची लागवड सुमारे एक हजार हेक्टरने वाढली आहे. मध्यंतरी ढगाळ व प्रतिकूल वातावरणाचा फटका या पिकाला बसला.

जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची लागवड सुमारे एक हजार हेक्टरने वाढली आहे. मध्यंतरी ढगाळ व प्रतिकूल वातावरणाचा फटका या पिकाला बसला. यात वाढ खुंटणे, करपा रोगाचा प्रादुर्भाव अशा समस्या होत्या. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी खते व पाण्याच्या व्यवस्थापनावर भर दिला. 

कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यात सुमारे सहा हजार हेक्टरवर झाली आहे. तर धुळ्यातही सुमारे दीड हजार हेक्टरवर कांदेबाग केळी आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा लागवड पाऊस लांबल्याने लागवड उशिरापर्यंत झाली. ही लागवड डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही सुरू होती. जिल्ह्यात चोपडा, जळगाव, पाचोरा व यावल तालुक्यातही कांदेबाग केळी आहे. धुळ्यात शिरपूर तालुक्यात कांदेबाग केळी अधिक आहे. 

या आठवड्यात ढगाळ वातावरण काहीसे दूर होताना दिसत आहे. परंतु दुपारी मध्येच अंशत ढगाळ वातावरण तयार होते. त्यात शेतकरी आपल्या कांदेबाग केळीला खते व पाण्याचे वेळापत्रकानुसार व्यवस्थापन करीत आहेत. अनेकांनी वारे अवरोधक म्हणून बागेभोवती सजीव कुंपण तयार केले आहे. त्यासाठी संकरित, उंच वाढणाऱ्या गवताची लागवड केली आहे. 

सध्या पिकाचे सिंचन रात्रीच्या वेळेस करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. यामुळे रात्रीच्या वेळेस बागेची प्रतिकारक्षमता वाढविण्यास मदत होते. तसेच काही शेतकरी बागेभोवती शेकोट्यादेखील पेटवत आहेत. यामुळे बागेला ऊब देण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बागेत बुरशीनाशकांची फवारणी घेतली. 

ड्रीपद्वारे खते

कमाल शेतकरी बागेला ड्रीपद्वारे खते देत आहेत. यातून खतांवरील खर्च कमी होत असतानाच खतांची कार्यक्षमताही वाढते. पिकाची स्थिती सध्या बरी आहे. कोरड्या व स्वच्छ सूर्यप्रकाशीत वातावरणाची पिकाला गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू संशोधन संस्था करतात काय?आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत...
शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे मारता, देश...मुंबई : ‘‘दिल्लीत शेतकरी आंदोलनासाठी बसले आहेत....
वाईत हळदीला उच्चांकी भावसातारा : शेतकऱ्यांचे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...
वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समिती...मुंबई : राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष...
मुंबई बाजार समितीत खरेदी-विक्री होणार...पुणे ः बदलत्या पणन कायद्यांमुळे बाजार...
दोन आठवड्यांत ‘एफआरपी’चे सव्वादोन हजार...पुणे : साखरेला कमी भाव व निर्यातीत अनेक समस्या...
विदर्भात कमाल तापमानात वाढपुणे ः कोरड्या हवामानामुळे उन्हाचा चटका वाढू...
आता भाजपविरोधात प्रचार करणार : संयुक्त...नवी दिल्ली ः केंद्राच्या नव्या कृषी...
उत्पादन, दर्जावाढीसाठी आंबा पुनरुज्जीवन...चांदोर (ता. जि. रत्नागिरी) येथील दत्ताराम राघो...
सैनिकाने केले बीजोत्पादनाचे तंत्र...भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्तीनंतर तांभेरे (ता....
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही ः ...मुंबई ः हवे तर सरकारने चार-पाच हजार कोटी रुपयांचे...
कृषी संचालक ‘कॅबिन’ बाहेर पडले पुणे ः राज्याच्या कृषी आयुक्तालयात बसलेल्या...
ऊन वाढण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी...
कोकणात यंदा उन्हाचा पारा चढणार पुणे : राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढू...
नवती केळीचे दर १३५० रुपये प्रतिक्विंटल जळगाव ः खानदेशात नवती केळीचे दर वधारून कमाल १३५०...
बाजारबंद, वेळांच्या निर्बंधांचा ...अकोला ः कोरोनामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या...
द्राक्ष व्यापारी नोंदणीला यंदाही...सांगली ः हंगामात द्राक्षाची खरेदी करण्यासाठी...
फळबाग लागवडीसाठी निधी देणार : दादा भुसेमुंबई : राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता...
तंत्रज्ञानाच्या जोरावर रेशीम उद्योग...रेशीम शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने...