agriculture news in marathi Bananas rate Rs 400 to Rs 1,100 per quintal in the state | Agrowon

राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२१) केळीची आवक २९० क्विंटल झाली होती. तिला प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपये, असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० रुपये होते.

नाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल  

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२१) केळीची आवक २९० क्विंटल झाली होती. तिला प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपये, असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता.२०) केळीची आवक २१० क्विंटल झाली. तिला ४०० ते १००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० रुपये होता. सोमवारी (ता.१९) केळीची आवक २९० क्विंटल झाली. तिला ४०० ते १००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० रुपये होता.

रविवारी (ता.१८) फळ बाजार बंद असल्याने आवक झाली नाही. शनिवारी (ता.१७) केळीची आवक २१० क्विंटल झाली. तीला ४०० ते १००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० रुपये होता. शुक्रवारी (ता.१६) आवक २५० क्विंटल झाली. तिला ४०० ते १००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० रुपये होता. गुरुवारी (ता.१५) केळीची आवक १०० क्विंटल झाली. तिला ४०० ते १००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० रूपये  होता.

मागील आठवड्यापासून बाजार समितीत केळीची आवक वाढत आहे. मात्र, किमान, कमाल व सरासरी दर स्थिर आहेत.

जळगावात ८०० ते ११०० रुपये दर

जळगाव : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये केळीची आवक कमी असते. केळीची शिवार किंवा थेट जागेवरच खरेदी ९५ टक्क्यांवर केली जाते. केळीचे दर स्थिर आहेत. गुरुवारी (ता.२२) केळीला ७०० ते ११००, तर सरासरी ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक चोपडा, जळगाव, पाचोरा, यावल आदी भागातून सुरू आहे. 

गुरुवारी सुमारे १६० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक झाली. सध्या कांदेबाग केळीची काढणी जिल्ह्यात सुरू आहे. नवती किंवा मृगबहार केळीची काढणी जानेवारीत सुरू होईल. केळीची आवक सध्या स्थिर आहे. सणासुदीमुळे केळी दरात मध्यंतरी सुधारणा झाली. दर टिकून आहे. कमी दर्जाच्या केळीला ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दरही मिळत आहे. 

रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर या भागात केळीची आवक कमी आहे. यामुळे केळीचे दर स्थिर आहेत. केळीची मागणी उत्तर भारतात चांगली आहे. दर्जेदार केळीची पंजाब, हरियाना, दिल्ली, काश्‍मिरात बॉक्समध्ये पॅकिंग करून साठवणूक सुरू आहे.

गेल्या मार्चमध्ये जिल्ह्यात कांदेबाग केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या तापी काठानजीकच्या चोपडा व जळगाव तालुक्यातील गावांमध्ये वादळ व गारपीट झाली होती. यात केळीचे १०० टक्के नुकसान झाले होते. यामुळे या भागात केळीची काढणी कमी असल्याची माहिती मिळाली.

सांगलीत प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रूपये

सांगली : येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. २२) केळीची १० ते १२ टनाची आवक झाली. त्यास प्रति वीस किलोंना १०० ते २००, तर सरासरी १८५ रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शिवाजी मंडईत सांगली जिल्ह्यातील आष्टा वाळवा कसबे डिग्रज दुधगाव मौजे डिग्रज यासह वाळवा भागातून केळीची आवक होते. बुधवारी (ता. २१) केळीची १० ते १२ टनाची आवक झाली. त्यावेळी प्रतिवीस किलोस १०० ते २००, तर सरासरी १८५ रुपये असा दर होता.

मंगळवारी (ता. २०) केळीची १२ ते १५ टनाची आवक झाली. त्यास प्रति वीस किलोस १५० ते २५०, तर सरासरी २०० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. १९) केळीची १० ते १२ टनाची आवक झाली. त्यावेळी प्रति वीस किलोस १०० ते २००, तर सरासरी १८५ रुपये असा दर होता.

नागपुरात ७७५ रुपये क्विंटल

नागपूर : अंजनगाव सुर्जी येथील बोर्डाच्या माध्यमातून गेल्या पंधरवड्यापासून केळीला ७२० ते ७७५ रुपये क्विंटलचा दर दिला जात आहे. 

सण उत्सवाच्या काळात मागणी वाढून केळीच्या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून केळीचे दर स्थिर असल्याची माहिती पांढरकवडा येथील केळी उत्पादक प्रकाश पुप्पलवार यांनी दिली. 

राज्यात तीन ठिकाणी केळीचे दर काढले जातात. त्यामध्ये नांदेड, जळगाव आणि विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुर्जी येथील बोर्डाला मान्यता आहे. त्यानुसार सण उत्सवाच्या काळात केळीचे दर वाढतील, अशी अपेक्षा उत्पादकांना आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व बाजारात सध्या आवक जेमतेम आहे.

नागपूरच्या कळमना बाजार समितीत केळीची शंभर ते दीडशे क्विंटल अशी आवक आहे. किरकोळ विक्रेत्यांकडून ३५ ते ५० रुपये डझन या दराने केळीची विक्री केली जात आहे.

परभणीत ४०० ते ६०० रूपये दर

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.२२) केळीची ३५ क्विंटल आवक होती. केळीला प्रतिक्विंटल किमान ४०० ते कमाल ६०० रुपये, तर सरासरी ५०० रुपये दर मिळाले.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून तसेच नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातून केळीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी केळीची ३५ ते ४० क्विंटल आवक होती. त्यावेळी प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता.२२) केळीची ३५ क्विंटल आवक होती. त्यावेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये होते. तर, किरकोळ विक्री १० ते ३० रुपये डझनाने सुरू होती, असे व्यापारी शेख नसीर यांनी सांगितले.

पुण्यात ८०० ते १००० रुपये दर

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील केळी बाजारात गुरुवारी (ता.२२) केळीची सुमारे १०० टन आवक झाली. यावेळी केळीला प्रतिकिलो ८ ते १० रुपये, तर सरासरी ९ रुपये दर मिळाला, अशी माहिती केळी व्यापारी फिरोज साचे यांनी दिली.

सध्या होणारी आवक ही उजनी धरण परिसरातील करमाळा, अकलूज, इंदापूर, टेंभुर्णी, बारामती तालुक्यांतून होत आहे. नवरात्रीमुळे केळीला मागणी वाढली आहे, असेही साचे यांनी सांगितले.

साताऱ्यात ५०० ते ७०० रूपये  

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच बाहेरच्या परिसरात केळीची प्रतिदिन पाच टनावर आवक होत आहे. केळीस प्रतिटन सरासरी पाच ते सात हजार रूपये दर मिळत आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

येथे केळी आवक मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जिल्ह्यातून होत आहे. नवरात्र उपवासामुळे केळी आवक वाढली आहे. सध्या पक्व केळीची सर्वाधिक आवक होत आहे. देशी वाणाच्या केळीची काही प्रमाणात आवक होत आहे. केळीची किरकोळ विक्री ४० ते ५० रूपये प्रति डझनप्रमाणे होत आहे.


इतर बाजारभाव बातम्या
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...
नाशिकमध्ये ढोबळी मिरचीची आवक सर्वसाधारण...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मिरचीला दराचा तडकाअकोला ः हिरवी मिरची यंदा संपूर्ण हंगामात चांगल्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवाळी दिवशीही... कोल्हापूर  : जिल्ह्यात यंदा झेंडू...
जळगावात झेंडूच्या बाजारात तेजीजळगाव : झेंडू फुलांची दिवाळीनिमित्त मोठी मागणी...
नाशिकमधील झेंडू उत्पादकांचा थेट...नाशिक : चालू वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेला परतीचा...
नगरमध्ये शेवंतीची फुले चारशे रुपये किलो नगर ः नवरात्रोत्सवात झालेल्या जोरदार पावसामुळे...
औरंगाबादमध्ये झेंडू सरासरी ६५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत पेरू १००० ते कमाल २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला...
राज्यात गवार १५०० ते ७००० रुपये...पुण्यात ५००० ते ७००० रुपये दर पुणे ः...
नाशिकमध्ये डाळिंब ७ हजार ५०० रुपये...नाशिक : ‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...