Agriculture news in marathi Bandh response of agricultural inputs sellers in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या बंदला प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

बियाणे उत्पादक कंपन्या ऐवजी विक्रेत्यांना यात ओढले जात आहे. ही बाब योग्य नाही. त्यामुळे आम्ही या बंदमध्ये सहभागी झालो. शासनाने सकारात्मक विचार करून कृषी निविष्ठा विक्रेत्यांना न्याय द्यावा.
- भगवान खैरनार, अध्यक्ष, नाशिक ऍग्रो डिलर्स असोसिएशन
 

नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स, डीलर्स असोसिएशनने १० ते १२ जुलै दरम्यान तीन दिवस कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बंद ठेवण्याचे जाहीर केले. त्यास नाशिक ऍग्रो डिलर्स असोसिएशनचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे शुक्रवारी (ता.१०) नाशिक शहरासह १४ जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. 

कृषी निविष्ठा विक्रेते हे शासनाने मान्यता दिलेल्या कंपन्यांकडून बियाणे खरेदी करून पिशवीबंद माल शेतकऱ्यांना विकतो. कंपनी व शेतकरी यांचा दुवा या प्रमाणे विक्री होते. मग विक्रेत्यांवर कारवाई का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. यात विक्रेत्यांचा थेट संबंध नसल्याने त्यांना कारवाईच्या कक्षेत आणू नये, अशी मागणी करण्यात आली. पहिल्या दिवशी कडकडीत बंदला पाळण्यात आला. पुढील दोन दिवस तो बंद कायम राहील, असे विक्रेत्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये बंद पाळण्यात आला. मात्र, मालेगाव तालुक्यात हा बंद पाळण्यात आला नाही. कृषिमंत्री दादा भुसे यांचा अप्रत्यक्ष दबाव असल्याची चर्चा आहे. तर, कृषी निविष्ठा विक्रेत्यांना संपर्क साधला असता, मालेगाव तालुक्यात सोयाबीन क्षेत्र कमी असल्याने सहभागी झालो नसल्याचे सांगण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...