दुष्काळ निवारणासाठी बँक असोसिएशनने पुढाकार घ्यावा : सुभाष देशमुख

दुष्काळ निवारणासाठी बँक असोसिएशनने पुढाकार घ्यावा : सुभाष देशमुख
दुष्काळ निवारणासाठी बँक असोसिएशनने पुढाकार घ्यावा : सुभाष देशमुख
   सोलापूर: राज्यात दुष्काळी परिस्थिती सर्वांसमोर उभी ठाकली आहे, पीक पाण्यावाचून ग्रामीण भाग होरपळत आहे, शासन आपल्यापरीने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करत आहे, पण बँकांनीही समाजाप्रती आपले कर्तव्य समजून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी बँक असोसिएशनने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.     सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक को. ऑप असोसिएशनच्या चेअरमन व पदाधिकाऱ्यांसमवेत सहकारमंत्री देशमुख यांनी दुष्काळ निवारणसंदर्भात बैठक घेतली. या वेळी मंत्री देशमुख म्हणाले, सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेऊन बँक असोसिएशनमधील प्रत्येकांनी किमान ३ तर गाव दत्तक घ्यावेत, टँकरने पाणीपुरवठा, वृक्ष लागवड, गाळउपसा असे कार्यक्रम हाती घेऊन दुष्काळ निवारणासाठी हातभार लावावा. देशात सोलापूर बँक असोसिएशनचे नाव अग्रेसर झाले पाहिजे असे काम करू.     या वेळी उपस्थित चेअरमन, पदाधिकाऱ्यांनी सहकारमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सकारात्मकता दर्शवून विस्तृत चर्चेसाठी बँक असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांची लवकरच एकत्रित बैठक बोलावून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com