बोंड अळीचा निधी देताना बॅंकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक

बोंड अळीचा निधी देताना बॅंकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक
बोंड अळीचा निधी देताना बॅंकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक

जळगाव : गुलाबी बोंड अळीने मागील हंगामात कापसासह शेतकऱ्याला उद्‌ध्वस्त केले. त्याचा निधी वर्षभरानंतर बॅंकांमध्ये आला. काही शेतकरी या निधीसाठी वणवण फिरत आहेत. बॅंकात आलेला निधी मिळविताना बॅंक व्यवस्थापन शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. ‘चार दिवसांनी या..., निम्मेच पैसे मिळतील'', अशी बतावणी जळगाव जिल्हा बॅंकेच्या ग्रामीण शाखांमधील कर्मचारी करीत आहेत.  या संदर्भात दोन गावांमधील शेतकऱ्यांनी ‘ॲग्रोवन''कडे जिल्हा बॅंकेच्या कानळदा (ता. जळगाव) शाखेत आलेला अनुभव सांगितला. हा प्रकार बॅंकेच्या वरिष्ठांनी लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  तक्रारदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानळदा येथील शाखेत बोंड अळी मदतनिधीचे पैसे शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर आले आहेत. त्यातील निम्मेच पैसे काढता येतील, असे कर्मचारी सांगतात. पूर्ण निधी कुणालाही देत नाहीत. एका शेतकऱ्याच्या खात्यावर पूर्वहंगामी कापसाचा निधी आला. या शेतकऱ्याच्या सातबारावर वारसदार आहे. त्याचे संमती प्रतिज्ञापत्र मागितले जाते. त्यानुसार शेतकरी ते बॅंकेत देतात. मात्र प्रतिज्ञापत्राबाबत कर्मचारी शंका उपस्थित करून हेलपाटे मारायला लावतात.  निधीसाठी पूर्वी तहसील कार्यालयात चकरा मारल्या. आता जिल्हा बॅंकेच्या कानळदा शाखेत चकरा माराव्या लागत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी सांगितली. या शाखेत असाच प्रकार सुरू राहिल्यास बचत खाते बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. शासनाने निधी दिला आहे. त्यावर बॅंकेचा अधिकार नाही. पण पदरच्या खिशातून निधी द्यावा लागत असल्याच्या आविर्भावात कर्मचारी असतात. शेतकऱ्यांची हकनाक अडवणूक कोली जाते. जिल्हा बॅंकेशी ३० ते ४० वर्षांचा शेतकऱ्यांचा संबंध आहे. ही बॅंक शेतकऱ्यांची आहे. त्यांच्याशी सचोटीने, नम्रतापूर्वक व्यवहार झाला पाहिजे, अशी मागणी या शेतकऱ्यांनी आपले नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com