Agriculture news in marathi; bankers review meeting, yavatmal, maharashtra | Agrowon

‘त्या’ बँकांमधील शासकीय खाती बंद करणार ः जिल्हाधिकारी गुल्हाने

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जुलै 2019

यवतमाळ : बँकांच्या आडमुठेपणामुळे शेतकरी कर्जापासून वंचित राहत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ज्या बँकांनी आतापर्यंत २० टक्क्यांपेक्षा कमी कर्ज वाटप केले असेल, अशा बँकांमधील शासकीय खाते दुसऱ्या बँकेत स्थलांतरित करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार भगत आदी उपस्थित होते.

यवतमाळ : बँकांच्या आडमुठेपणामुळे शेतकरी कर्जापासून वंचित राहत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ज्या बँकांनी आतापर्यंत २० टक्क्यांपेक्षा कमी कर्ज वाटप केले असेल, अशा बँकांमधील शासकीय खाते दुसऱ्या बँकेत स्थलांतरित करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार भगत आदी उपस्थित होते.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले की, जूनअखेरपर्यंत ५० टक्के तर आजपावेतो १०० टक्के पीककर्ज वाटप होणे अपेक्षित होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत ७३ टक्के, तर स्टेट बँक ऑफ इंडियाने ३५ टक्के कर्ज वाटप केले आहे.

मात्र, अजूनही जिल्ह्यातील काही बँका २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. जे पात्र सभासद आहेत, त्यांना आतापर्यंत १०० टक्के कर्जवाटप व्हायला पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही. पात्र सभासदांच्या याद्या बँकेच्या शाखानिहाय लावणे गरजेचे आहे. तसेच, या याद्या त्वरित तहसीलदारांकडेसुद्धा देण्यात याव्यात. पुढील आठवड्यापर्यंत कर्ज वाटपाची गती वेगाने न झाल्यास संबंधित बँकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

जिल्ह्यात १२ जुलैपर्यंत १ लक्ष ३६ हजार ९१० पात्र सभासदांना ८४५ कोटी ७५ लक्ष रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ही आकडेवारी ३९.१२ टक्के आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा २० टक्क्यांच्या खाली कर्ज वाटप करणाऱ्या बँका सहा असून, यात अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॉर्पोरेशन बँक आणि पंजाब नॅशनल बँकेचा समावेश आहे.
 


इतर बातम्या
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
‘सेवा हमी'साठी मोबाईल ॲप्लिकेशन विकसितसोलापूर : ‘‘सेवा हमी हक्क कायद्याची अंलबजावणी...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...