नाशिकला बॅनरबाजीवरून राजकीय वातावरण तापले

नाशिकला बॅनरबाजीवरून राजकीय वातावरण तापले
नाशिकला बॅनरबाजीवरून राजकीय वातावरण तापले

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर फलक लावणाऱ्या भाजप नगरसेवकाला बुधवारी (ता. ७) पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करीत उत्तर दिले. या वेळी लावलेले फलक जाळले. ‘‘भाजपवाल्यांनो सत्तेचा माज करू नका. आम्ही तुमच्यासारखे असभ्य नाही. अन्यथा तुमच्या घरात घुसून उत्तर देऊ. पातळी सोडाल तर आमचाही हिसका दाखवू,’’ या शब्दांत इशारा देण्यात आला.  भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत अपेक्षार्ह भाषेतील बॅनर शहरात लावले होते. याबाबत माहिती मिळाल्यावर त्याचे तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा अनिता भामरे, युवक आघाडीचे पुरुषोत्तम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडत तो जाळला.  या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. या वेळी जिल्हा अध्यक्षा बलकवडे म्हणाल्या, ‘‘भाजपच्या नगरसेवकाने माजी उपमुख्यमंत्र्याविषयी अत्यंत लज्जास्पद भाषा असलेला बॅनर लावला आहे. त्यातून या पक्षाचा स्तर स्पष्ट होतो. त्यांना सत्तेचा माज आला आहे. शहरभर फलक लावताना पक्षाच्या कार्यालयासमोर फलक लावण्याची हिंमत त्यांनी केली.  हे आहे प्रकरण  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाच्या संबोधले होते. याच निषेध म्हणून अजित पवार यांचे अपेक्षार्ह बॅनर भाजप नगरसेवकाने लावले. त्यामुळे हा सर्व राजकीय संघर्ष उफाळून आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com