पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात बॅंकांकडून हात आखडता

पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. खरीप हंगामात शेतकरी आर्थिक अडचणीत असताना बँकेने पीक कर्जासाठी पुणे जिल्ह्यातील काही राष्ट्रीयीकृत व खासगी बँकेने हात आखडता घेतला आहे.
Banks are reluctant to disburse crop loans in Pune district
Banks are reluctant to disburse crop loans in Pune district

पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. खरीप हंगामात शेतकरी आर्थिक अडचणीत असताना बँकेने पीक कर्जासाठी पुणे जिल्ह्यातील काही राष्ट्रीयीकृत व खासगी बँकेने हात आखडता घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँकेची वाट धरली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज दिल्याचे जिल्हा अग्रणी बँकेकडे दाखल झालेल्या पीककर्ज वितरणाच्या २८ मेपर्यंतच्या अहवालावरून दिसून आले आहे.

सध्या जिल्ह्यात ३१ मार्च अखेरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमित परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना सहकारी व खासगी बँकेकडून प्राधान्याने कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी परतफेड केली नाही, अशा शेतकऱ्यांनी उशिराने कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.  

पुणे जिल्हा अग्रणी बँकेने जिल्ह्यातील सर्व बँकांना खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून पीककर्जाचे वाटप सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी जिल्हा अग्रणी बॅंकेने शेतीसाठी दोन हजार ६३ कोटीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी २८ मेअखेरपर्यंत एक लाख सहा हजार ४७४ शेतकऱ्यांना ९२५ कोटी ७७ लाख म्हणजेच ४१ टक्के वाटप केले आहे. इतर खासगी बॅंकेनेही काही प्रमाणात हात आखडता घेतला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. या काळात त्याला आधार देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. तरीही पुणे जिल्ह्यातील बॅंकांनी दिलेल्या उद्देशानुसार पीक कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना केलेले नाही. जिल्ह्यात युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीस बँक, कॉर्पोरेशन बँक, सेट्र्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र आणि सिंडिकेट बँक या राष्ट्रीयीकृत बँकेने अवघे १२ टक्केपेक्षा कमी पीककर्जाचे वाटप केले आहे. तर अॅक्सीस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय, कोटक महेंद्रा, रत्नाकर या खासगी बँकेने तीन टक्केपेक्षा पीक कर्जाचे वाटप केले आहे.  

जिल्हा बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करत आहेत. खरीप पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भुईमूग अशा अनेक पिकांना पीककर्जाचे वाटप करत आहे.

कर्जवाटपाचे उद्दिष्ट व वाटपाची स्थिती ः उद्दिष्ट, लाख रूपये
बँक   उद्दिष्ट शेतकरी संख्या  कर्ज वाटप वितरणाची टक्केवारी
व्यापारी बँका  ८२७ कोटी ४९ लाख ३४९४  १९९ कोटी ६ लाख १२ टक्के
ग्रामीण बँका २ कोटी ५६ लाख  ७ लाख   ३ टक्के
सहकारी बँक १२३२ कोटी ९७ लाख  १,०२,९७४ ८२५ कोटी १ लाख रुपये   ५८ टक्के
एकूण  २०६३ कोटी २ लाख  १,०६,४७४  ९२५ कोटी ७७ लाख  ४१ टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com