पीकविम्याबाबत बॅंकांची ढिलाई कायम

पीकविम्याबाबत बॅंकांची ढिलाई कायम
पीकविम्याबाबत बॅंकांची ढिलाई कायम

सोलापूर : गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम भरूनदेखील बॅंका व विमा कंपनीच्या चुकीमुळे विम्याच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांना तत्काळ न्याय देण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनदेखील अद्याप विमा कंपन्या व बॅंकांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे आता जिल्हाधिकारी भोसले यांनी पुन्हा मंगळवारी (ता. ६) या विषयावर बैठक बोलावली आहे.

पंधरवड्यापूर्वीच पीकविम्यातील घोळाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सक्त सूचना दिली होती. त्या नंतर काहीशा हालचाली झाल्या. त्यातून सालसे येथील शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्‍न सुटला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बॅंक, विमा कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी व सीएससी केंद्र चालक यांची संयुक्त बैठक घेतल्यानंतर हा प्रश्‍न सुटला. 

त्यानंतर या परिसरातील दोन हजार ५७० शेतकऱ्यांना जवळपास चार कोटी ३३ लाख रुपयांची मदत मिळाली आहे. पण पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा युनियन बॅंकेकडे असलेला प्रश्‍न व सांगोला तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडे असलेला प्रश्‍न अद्याप मार्गी लागलेला नाही.

पंढरपुरातील ५० आणि सांगोल्यातील जवळपास ४५० शेतकऱ्यांनी पीकविम्यापोटी बॅंकेकडे प्रिमियम भरूनही कंपनीपर्यंत पोचला नाही, परिणामी त्यांना मदत मिळाली नाही. या बैठकीत त्यावरही चर्चा झाली. पण अद्याप हा प्रश्‍न जैसे थे आहे. आता मंगळवारच्या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे लक्ष आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com