agriculture news in marathi Banks disburse crop loans To be completed on time: Bhosle | Agrowon

बँकांनी पीक कर्जवाटप वेळेत पूर्ण करावे : भोसले

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जानेवारी 2021

नगर:  ‘‘जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना दिलेले कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.

नगर:  ‘‘जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना दिलेले कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे,’’ असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. त्याचबरोबर शासन योजनांच्या लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

जिल्हास्तरीय बँकर्स समितीची शनिवारी (ता. १६) जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी पीक कर्जवाटप, विविध योजनांसाठी केलेले कर्जवाटपाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेतला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप नचित, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी संदीप वालावलकर, रिझर्व्ह बँक प्रतिनिधी सिंदकर, नाबार्डचे जिल्हा उप महाव्यवस्थापक शीतलकुमार जगताप उपस्थित होते. 

डॉ. भोसले म्हणाले, ‘‘जिल्हास्तरीय बैठकीत घेतलेल्या निर्णयांची तसेच सूचनांची माहिती तालुका स्तरावर संबंधितांनी पोहोचवावी. जेणेकरून, तातडीने त्यावर अंमलबजावणी होऊ शकेल.`` 

बँकांच्या कामगिरीवर नाराजी

प्रत्येक बँकेला कर्जवाटपाचे उद्दिष्ट यापूर्वीच देण्यात आले. बँकांनी ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. खरीप हंगामात ज्या बँकांची कामगिरी समाधानकारक नव्हती. त्याबाबत नाराजी व्यक्त करून रब्बी हंगामात या बँकांनी त्यांच्या कामगिरीत सुधारणा कराव्यात, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पेच बीड : जिल्हा बँकेच्या १९ संचालक मंडळाच्या होऊ...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
‘सोलापूर, पुण्यात वन्यप्राणी हल्ला...सोलापूर ः ‘‘पुणे आणि सोलापूर वनविभागांतर्गत...
अनवलीतील नीरा भाटघरच्या कॅनॉलची...सोलापूर ः ‘‘पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील नीरा...
‘पोकरा’तंर्गत योजनेत भाग घ्या ः देशमुखनांदेड : ‘‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
रखडलेल्या सूक्ष्म सिंचन फायलींचा मार्ग...अकोला ः गेल्या तीन वर्षांमध्ये प्रलंबित असलेले...
जवसाचे आरोग्यदायी महत्त्व जाणावे ः डॉ....अकोला ः शेतकऱ्यांनी जवसाचे उत्पन्न घेताना तेलाचा...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
बुलडाणा : दूध उत्पादक, विक्रेत्यांना...बुलडाणा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी...
शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी नवरदेवाची...नाशिक खामखेडा ता. देवळा : देवळा तालुक्यातील...
आमदारांच्या कुटुंबीयांसाठीच जिल्हा...नगर : जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत...
नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे...औरंगाबाद: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत अनु....
पंढरपुरात माघवारीनिमित्त श्री विठ्ठल-...पंढरपूर, जि. सोलापूर : माघवारी जया शुद्ध...
सीताफळ निर्यात वाढण्यासाठी तज्ज्ञांचे...बीड : केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ कृषी निर्यात...
पुसदमध्ये ‘पणन’ची कापूस खरेदी बंदआरेगाव, जि. यवतमाळ : पुसद तालुक्यात सोमवार (ता....
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत...पुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी...
काँग्रेस-राष्ट्रवादीचा सांगलीत ‘...सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे...
नियमित कांदा निर्यात सुरू राहण्यासाठी...नाशिक : जिल्ह्यात कांदा महत्त्वाचे पीक आहे. मात्र...
गारपीटग्रस्तांचे पंचनामे करा ः...नागपूर : कुही तालुक्यात पाऊस व गारपिटीमुळे मिरची...