रत्नागिरी : पीककर्जावरील व्याजमाफीसाठी बँका उदासीन

रत्नागिरी : पीककर्जावरील व्याजमाफीसाठी बँका उदासीन
रत्नागिरी : पीककर्जावरील व्याजमाफीसाठी बँका उदासीन

रत्नागिरी : शासनाने पीककर्जावरील व्याजमाफी देण्याची घोषणा २०१५ साली केली; मात्र आतापर्यंत अवघ्या पंधरा लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीयीकृत बँकांकडूनच प्रस्ताव येत नसल्याने सहकार विभागाकडून त्याला मंजुरी मिळत नसल्याचा मुद्दा नुकताच पुढे आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी बँकांचा हलगर्जीपणा पुढे आणला. त्यामुळे पीक कर्जावरील व्याजमाफी देण्यात राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता घेत असल्याचे समोर आले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये स्थानिक आमदार सामंत, आंबा बागायतदार, बँकांचे अधिकारी, उपनिबंधक कार्यालयाच्या प्रतिनिधींची बैठकी झाली.

आंबा बागायतदारांचा रखडलेला प्रश्‍न सोडविण्यासाठी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याबरोबर सामंत यांच्या पुढाकराने मंत्रालयात बैठक झाली होती. त्या वेळी व्याजमाफीची प्रकरणे मंजूर करण्यात सहकार खात्याची चुकी नसल्याचे स्पष्ट झाले होते. २०१५ मध्ये व्याजमाफी देण्याचा अध्यादेश निघूनही तसे प्रस्ताव बँकांकडूनच पुढे आले नव्हते. राष्ट्रीयीकृत बँकांकडून प्रस्ताव वेळेवर न आल्यामुळे आंबा बागायतदारांवर अन्याय होत आहे. मात्र महसुल विभाग, शासनाकडे बोट दाखवून बँका विषय मारून नेत असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले.

कर्जावरील व्याजमाफी आणि कर्जाचे पुनर्गठन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. साधारण बँकांनी १०.२५ टक्के बागायतदारांना कर्ज दिले. वर्षात ते पुनर्गठित न झाल्यास त्याचा व्याजदर वाढून तो १२.१५ किंवा १३.१५ टक्के होईल. यामध्ये बँकांचा फायदा आहे. बँकांनी शेतकऱ्यांचे हे प्रस्ताव शासनाकडे न पाठविल्याने लीड बँकेसह काही बँकांनी चांगला बिझनेस करून घेतला. मात्र बँकांचे शहाणपण आमच्या लक्षात आले आहे. येत्या पंधरा दिवसांत बँकांनी शेतकरी, बागायतदारांचे प्रस्ताव न दिल्यास बँकांना टाळे ठोकू, असा इशारा सामंत यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com