नाशिक : जिल्हा बँकांची सद्यपरिस्थिती पाहता राष्ट्रीयीकृत बँकांनी जास्तीचा पीक कर्जपुरवठा शेतकऱ्यांना करावा, यासाठी तशा सूचना संबंधित बँकांना राज्यस्तरावरून द्याव्या, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवार (ता.२१) राज्यस्तरीय खरीपपूर्व आढावा बैठकीत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कॉन्फरंन्स झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री भुजबळ यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने सहभागी झाले होते.
भुजबळ म्हणाले, ‘‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील अटी शिथिल करून खासगी, शासकीय रोपवाटिका करून शेतकऱ्यांना परवान्यावर कलमे-रोपे घेण्यास परवानगी मिळावी.'मागेल त्याला शेततळे'ही योजना सन २०२०-२१ मध्ये सुरु ठेवून शेतकऱ्यांना प्रती शेततळे रुपये ५० हजार ऐवजी वाढ करून रुपये ७५ हजार अनुदान मिळावे. महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेत जिल्ह्यातून १ लाख ३७ हजार शेतकरी पात्र आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे अनेक लाभार्थ्यांना लाभ अद्याप मिळालेला नाही, तो त्यांना तात्काळ द्यावा.’’ भुजबळ यांच्या मागण्या
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.