agriculture news in marathi Banks to lend more crop Give instructions from the state level: Bhujbal | Agrowon

जास्त पीक कर्जवाटप करण्यासाठी बँकांना राज्यस्तरावरून सूचना द्या ः भुजबळ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

नाशिक : जिल्हा बँकांची सद्यपरिस्थिती पाहता राष्ट्रीयीकृत बँकांनी जास्तीचा पीक कर्जपुरवठा शेतकऱ्यांना करावा, यासाठी तशा सूचना संबंधित बँकांना राज्यस्तरावरून द्याव्या, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवार (ता.२१) राज्यस्तरीय खरीपपूर्व आढावा बैठकीत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे केली. 

नाशिक : जिल्हा बँकांची सद्यपरिस्थिती पाहता राष्ट्रीयीकृत बँकांनी जास्तीचा पीक कर्जपुरवठा शेतकऱ्यांना करावा, यासाठी तशा सूचना संबंधित बँकांना राज्यस्तरावरून द्याव्या, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवार (ता.२१) राज्यस्तरीय खरीपपूर्व आढावा बैठकीत ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कॉन्फरंन्स झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री भुजबळ यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने सहभागी झाले होते. 

भुजबळ म्हणाले, ‘‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील अटी शिथिल करून खासगी, शासकीय रोपवाटिका करून शेतकऱ्यांना परवान्यावर कलमे-रोपे घेण्यास परवानगी मिळावी.'मागेल त्याला शेततळे'ही योजना सन २०२०-२१ मध्ये सुरु ठेवून शेतकऱ्यांना प्रती शेततळे रुपये ५० हजार ऐवजी वाढ करून रुपये ७५ हजार अनुदान मिळावे. महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेत जिल्ह्यातून १ लाख ३७ हजार शेतकरी पात्र आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे अनेक लाभार्थ्यांना लाभ अद्याप मिळालेला नाही, तो त्यांना तात्काळ द्यावा.’’ 

भुजबळ यांच्या मागण्या 

  • जिल्ह्यातील कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ, सामुहिक शेततळे व संरक्षित शेतीसाठी लक्षांक वाढवा 
  • रेल्वेने कांदा वाहतूक करताना विलंब शुल्क माफ करावे, केंद्र सरकारकडे तशी मागणी करा 
  • सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्याची नवीन योजना शासनस्तरावरून प्रस्तावित करा 
  • हंगामी द्राक्ष पिकाबाबत कृषी विद्यापीठाने संशोधन हाती घ्यावे. त्यांच्या शिफारशीनुसार फळ पिक विमा योजनेत पुर्वहंगामी द्राक्ष पिकाचा समावेश करावा. 
  • शेतीकामे करणाऱ्या मजुरांचा समावेश म.ग्रा.रो.ह.यो.मध्ये करा 

इतर बातम्या
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...