agriculture news in Marathi, banks not provide proper crop loan, the farmers are angry | Agrowon

जळगाव : पीक कर्जवाटपात यंदाही बॅंकांचा हात आखडता, शेतकरी नाराज
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 मे 2019

जळगाव : खरिपासंबंधी पीककर्ज वितरण संथगतीने सुरू असून, दिलेल्या लक्ष्यांकाच्या तुलनेत नऊ टक्केही पीककर्ज वितरण झालेले नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये शेतकऱ्यांची अडवणूक अधिक होत असून, यंदाही बॅंकांनी हात आखडता घेतला आहे. जळगाव व धुळे, नंदुरबार जिल्हा बॅंकेची मात्र पीक कर्जवाटपात समाधानकारक कामगिरी असल्याची माहिती आहे. 

जळगाव : खरिपासंबंधी पीककर्ज वितरण संथगतीने सुरू असून, दिलेल्या लक्ष्यांकाच्या तुलनेत नऊ टक्केही पीककर्ज वितरण झालेले नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये शेतकऱ्यांची अडवणूक अधिक होत असून, यंदाही बॅंकांनी हात आखडता घेतला आहे. जळगाव व धुळे, नंदुरबार जिल्हा बॅंकेची मात्र पीक कर्जवाटपात समाधानकारक कामगिरी असल्याची माहिती आहे. 

गेल्या वर्षी शेतकऱ्यांना खरिपाचे कर्जवाटपात सर्वच बॅंकांनी आखडता हात घेतला होता. तशीच स्थिती या वर्षातही आहे. काही राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या ग्रामीण भागातील शाखांमध्ये नव्याने ग्राहक होणाऱ्या किंवा कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांना पीककर्जच दिले जात नाही. अशा शेतकऱ्यांना मुख्यालयात किंवा जिल्हास्तरावरील मुख्य शाखेत पाठविले जात आहे. या हंगामात सुमारे तीन हजार कोटी रुपये कर्जवाटप करायचे आहे. सेंट्रल बॅंक ही अग्रणी बॅंक म्हणून कार्यरत आहे. परंतु, सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांनी मिळून जेवढे कर्जवाटप केले आहे, त्या तुलनेत जळगाव जिल्हा बॅंकेने अधिक पीककर्ज वितरण केले आहे.

मागील आठवड्याच्या सुरवातीपर्यंत बॅंकेने सुमारे १२० कोटी रुपयांवर पीककर्ज वितरण केले. तर सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांनी मिळून १५० कोटी रुपयेदेखील पीककर्ज वितरण केलेले नाही. जळगाव जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये खरीप हंगामासाठी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट २ हजार ९२२ कोटी ९ लाख एवढे होते. मात्र, प्रत्यक्षात १ हजार १९ कोटींचेच कर्जवाटप झाले. अर्थात केवळ ३५ टक्के कर्जवाटप करण्यात आले होते. २०१८ मध्ये कर्जमाफीचा विषय प्रलंबित असताना शेतकऱ्यांना मदत म्हणून दहा हजारांची मदत राष्ट्रीयकृत बॅंकांनी देण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र, अशी मदत केवळ बोटावर मोजता येतील एवढ्याच शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात खरीप पीककर्ज वितरणासंबंधी सुमारे १४०० कोटी व धुळे जिल्ह्यांत सुमारे १२८० कोटी रुपये लक्ष्यांक आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत कार्यरत धुळे-नंदुरबार जिल्हा बॅंकेने मागील आठवड्याच्या मध्यापर्यंत सुमारे २३ कोटी रुपये पीक कर्जवाटप केले. तर नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ६० कोटी आणि धुळे जिल्ह्यांत ३५ कोटी रुपये पीककर्ज वितरण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तेथेही पीककर्ज वितरणाची टक्केवारी फक्त पाच टक्‍क्‍यांपर्यंतही नाही, असे सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...