agriculture news in marathi On the banks of the river Bhima-Nira Villages should be vigilant | Page 2 ||| Agrowon

भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क राहावे

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 जुलै 2021

सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निरेवरील धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु आहे. त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.

सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निरेवरील धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु आहे. त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.  त्यामुळे भीमा व नीरा नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे’’, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.

‘‘गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने तसेच पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील शेत पिकांची व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संभाव्य आपत्तीवर वेळेत व प्रभावीपणे कार्यवाही पार पाडण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी समन्वय ठेवावा.  वेळोवेळी पाणी पातळीत होत असलेल्या बदलांबाबत नदीकाठच्या गावांना अवगत करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

तात्पुरत्या निवाऱ्यासाठी सुरक्षित असलेल्या शासकीय इमारती, शाळा, मंदिर या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा, विद्युत पुरवठा सुरळीत व सुरक्षित राहील, याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी’’, अशा सूचनाही प्रांताधिकारी ढोले यांनी केल्या.

शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे

आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्तरीय समितीने सतर्क राहावे, शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणीच थांबावे.  महसूल, पोलिस, लघुपाटबंधारे, जलसंधारण, पाणी पुरवठा, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, कृषी व ग्रामपंचायत विभागांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे, अशा सूचनाही ढोले यांनी या वेळी दिल्या.


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...