Agriculture news in marathi; Banks should fulfill the goal of kharif loan: Chandrasekhar Bavankule | Agrowon

बॅंकांनी खरीप कर्जाची उद्दिष्टपूर्ती करावीः चंद्रशेखर बावनकुळे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

नागपूर ः शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बॅंकांनी आवश्‍यकतेनुसार आणि वेळेवर कर्ज उपलब्ध करावे त्याकरिता गावनिहाय कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. 

नागपूर ः शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बॅंकांनी आवश्‍यकतेनुसार आणि वेळेवर कर्ज उपलब्ध करावे त्याकरिता गावनिहाय कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. 

बचत भवन सभागृहात खरीप हंगामातील कर्जवाटप, तसेच कर्जमाफीसंदर्भात विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी मार्गदर्शन करताना श्री. बावनकुळे बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक बारापात्रे उपस्थित होते.

खरीप हंगामासाठी विविध बॅंकांना ९७९ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्‍यक असलेले बियाणे, खते, तसेच मशागतीसाठी कर्जाची आवश्‍यकता असल्यामुळे प्रत्येक गावात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी शाखानिहाय कर्जमेळावे आयोजित करावेत. या कर्ज मेळाव्यात उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होईल, या दृष्टीने नियोजन करावे, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
 
खरीप कर्जवाटपाचे मागील वर्षी केवळ ७२४ कोटी म्हणजे ६० टक्‍के उद्दिष्ट गाठण्यात आले होते. परंतु या वर्षी १०० टक्‍के उद्दिष्टपूर्तीसाठी बॅंकांनी पुढाकार घ्यवा. महसूल व सहकार विभागातर्फे बॅंकांना आवशक मदत देण्यात येईल. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७० हजार ३५६ शेतकऱ्यांचे ४३४ कोटी ५२ लक्ष रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. यामध्ये ५० हजार २९१ शेतकऱ्यांचे ३४१ कोटी ५५ लक्ष रुपयांची कर्जमाफी, ओटीएस योजनेमध्ये ५ हजार ५५७ शेतकऱ्यांना ६० कोटी ९५ लक्ष रुपये तर इन्सेन्टिव्ह योजनेमध्ये १४ हजार ३०८ शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यावेळी विविध बॅंकांनी त्यांच्याव्दारे वितरीत कर्जाची माहिती दिली.

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...