बुलडाण्यात बँकांनी पीककर्ज वितरणाचे नियोजन करावे ः जिल्हाधिकारी

बुलडाणा : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत यावर्षी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्जाचा मोठा आधार मिळणार आहे. बँकांनी कुठल्याही प्रकारे शाखांमध्ये गर्दी होऊ न देता सर्व नियम पाळून पीककर्ज वितरणाची कार्यवाही करावी. बँकांनी सोपी व पारदर्शक पद्धत अंगीकारून पीककर्ज वितरणाचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिल्या.
Banks should plan for peak loan disbursement in Buldana: Collector

जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम पीककर्ज वितरण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. मनवर, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. बँकांनी आपल्या क्षेत्रानुसार नियोजनबद्ध पद्धतीने पीक कर्जासाठी कागदपत्रे घेण्यासाठी मेळावे आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या. 

यावेळी सुमन चंद्रा म्हणाल्या की, यावेळी शेतकऱ्यांकडून सुरक्षित अंतर राखण्याचे पालन करीत कागदपत्रे घ्यावीत. त्यासाठी एक फेरी आयोजित करावी. तर दुसऱ्या फेरीत पीककर्ज वितरण करावे. शेतकऱ्यांना यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होवू देऊ नये. शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक द्यावी. तालुकास्तरावर बँकांनी बैठका घेऊन त्यासाठी महसूल यंत्रणेचा सहभाग घ्यावा. बँकांकडे यापूर्वी ज्या शेतकऱ्यांची केवायसी केलेली असेल किंवा केवायसीसाठी कागदपत्रे घेतलेली असतील, तर त्यांच्याकडून पुन्हा कागदपत्रे मागवू नये. बैठकीत जिल्ह्यातील विविध बँकाकडून पात्र शेतकरी, पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टाचा आढावा घेण्यात आला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com