यवतमाळमधील बँकांनी पीक कर्जवाटपाचे शंभर टक्के नियोजन करावे

यवतमाळ : कोविड बाबत शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून या वर्षीच्या खरीप हंगामात प्रत्येक बँकांनी शंभर टक्के पीककर्ज वाटपाचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
Banks in Yavatmal should plan 100% of crop loan disbursement
Banks in Yavatmal should plan 100% of crop loan disbursement

 यवतमाळ : कोविड बाबत शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून या वर्षीच्या खरीप हंगामात प्रत्येक बँकांनी शंभर टक्के पीककर्ज वाटपाचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडक बँकाच्या प्रतिनिधींशी तसेच इतर प्रतिनिधींशी ऑनलाइन पद्धतीद्वारे त्यांनी संवाद साधला. या वेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) रमेश कटके, भारतीय स्टेट बँकेचे गिरीश कानेर आदी उपस्थित होते. 

जिल्ह्याच्या दृष्टीने खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप हा प्राधान्याचा आणि अतिशय महत्वाचा विषय आहे, असे सांगून जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील जवळपास तीन लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करायचे आहे. गतवर्षीची उद्दिष्टपूर्ती पाहून या वर्षी प्रत्येक बँकेला पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत सुद्धा पंचसुत्रीच्या नियमांचे पालन करून शेतकऱ्यांना कर्जवाटप होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे गतवर्षी कोरोनाबाबतचे निर्बंध अतिशय कडक होते. या वर्षी कृषी क्षेत्राला यातून मोठ्या प्रमाणात सवलत मिळाली आहे. त्यामुळे कर्जवाटपात बँकांना कोणतीही अडचण राहता कामा नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 

सन २०२१-२२ करीता जिल्ह्याला २२८० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात रब्बी हंगामासाठी २२१० कोटी तर रब्बी हंगामासाठी ७० कोटींचे वाटप करावयाचे आहे. सर्वाधिक उद्दिष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला असून, पीक कर्जवाटपाचा हा आकडा ६३७ कोटी ९३ लक्ष रुपयांचा आहे. यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाला ५९८ कोटी ३४ लक्ष रुपयांचे उद्दिष्ट, सेंट्रल बँक ऑफ इंडिया १८३ कोटी ४३ लक्ष रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला १६४ कोटी ९४ लक्ष रुपये, बँक ऑफ महाराष्ट्राला १५२ कोटी ७६ लक्ष रुपये आणि युनियन बँक ऑफ इंडियाला १३९ कोटी ४५ लक्ष रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 

गेल्यावर्षी ७५ टक्के पीक कर्जवाटप

इतर बँकांना पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. गतवर्षी जिल्ह्यात १६९३ कोटींचे (७५ टक्के) पीक कर्ज वाटप झाले होते. अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा हा कर्ज वाटपात प्रथम क्रमांकावर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com