बारामतीत पवार विरुद्ध पडळकर लढत होणार

बारामतीत पवार विरुद्ध पडळकर लढत स्पष्ट
बारामतीत पवार विरुद्ध पडळकर लढत स्पष्ट

पुणे ः विधानसभेच्या महायुती आणि आघाडीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब अद्याप झालेले नसताना, मात्र काँग्रेस आणि शिवसेनेने काही जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती आणि पुरंदरची लढत स्पष्ट झाली असून, बारामतीमधून अजित पवार आणि गोपीचंद पडळकर, तर पुरंदरमधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप जगताप आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि मंत्री विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

जिल्ह्यातील इंदापूर, दौंडमधून महायुतीकडून अनुक्रमे हर्षवर्धन पाटील आणि राहुल कुल यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. तर राष्ट्रवादीकडून अनुक्रमे दत्ता भरणे आणि रमेश थोरात यांची नावे आघाडीवर आहेत. भोरमधून काँग्रेसचे संग्राम थोपटे यांच्या विरोधात शिवसेनेकडून कुलदीप कोंडे यांचे नाव आघाडीवर आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधून शिवसेनेकडून विद्यमान आमदार शरद सोनवणे मंगळवारी (ता. १) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके गुरुवारी (ता. ३) शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली असली तरी, काँग्रेसकडून सत्यशील शेरकर हेदेखील प्रयत्नशील आहेत. तर शिवसेनेकडून हकालपट्टी झालेल्या जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांना मनसेकडून उमेदवारी मिळाल्यास ही लढत रंगतदार ठरणार आहे. 

आंबेगावमधून विद्यमान आमदार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारी अंतिम असून, शिवसेनेकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना उमेदवारी मिळाल्यास ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. तर खेडमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असून, राष्ट्रवादीकडून माजी आमदार दिलीप मोहिते चर्चेत आहेत. शिरूरमधून भाजपचे विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांची उमेदवारी अंतिम समजण्यात येत असून, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून अशोक पवार प्रबळ दावेदार आहेत. तर मावळमधून भाजपकडून मंत्री  संजय भेगडे यांची उमेदवारी अंतिम समजण्यात येत असून, राष्ट्रवादीकडून बापू आणि बबन भेगडे यांची नावे चर्चेत आहेत. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील लढती स्पष्ट होऊन, प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com