agriculture news in marathi, Baramati jawar prices are Rs. 4 thousand per quintal | Agrowon

बारामतीत ज्वारीचे दरप्रतिक्विंटल चार हजार रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) आणि सोमवारी (ता. २९) बाजार आवारात लिलावामध्ये ज्वारीला चार हजार रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. गुरुवारी (ता. २५) क्विंटलला कमाल ४०१५ रुपये, किमान २ हजार ५०० रुपये एवढा, तर सरासरी तीन हजार ५०० रुपये एवढा दर मिळाला आहे. बाजार आवारात एकूण ५०६ क्विटंलची आवक झाली होती.

पुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) आणि सोमवारी (ता. २९) बाजार आवारात लिलावामध्ये ज्वारीला चार हजार रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. गुरुवारी (ता. २५) क्विंटलला कमाल ४०१५ रुपये, किमान २ हजार ५०० रुपये एवढा, तर सरासरी तीन हजार ५०० रुपये एवढा दर मिळाला आहे. बाजार आवारात एकूण ५०६ क्विटंलची आवक झाली होती.

सोमवारी (ता. २९) ३४५ क्विंटलची आवक झाली होती. हा दर शेतकरी हनुमंत चांगण, गणेश चांगण, मधुकर सोलवणकर, गजानन चांगण, श्री. नाळे, श्री. महाडिक यांनी आणलेल्या ज्वारीस मिळाला आहे. बारामतीतील बाजार समितीत तालुक्यासह, दहीवडी, माण, पुसेगाव, इंदापूर, दौंड, फलटण, दुधवाबी, राशीन या भागातील शेतकरी ज्वारी आणून विकत असतात. सध्या पूर्व पट्ट्यातील अनेक भागात पाणीटंचाई भासत आहे. खरिपातही कमी पावसामुळे पिके वाया गेली आहेत.

शेतकरी स्वतःकडील असलेल्या शेतीमाल बाजारात विक्रीस तयार होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजार आवारात कमी आवक असल्याने शेतीमालाचे दर मागणी व पुरवठा यानुसार मिळत असल्याने बाजारभाव तेजीत आहेत. मार्केटमध्ये बाळासाहेबर फराटे, अमोल वाडीकर, शिवाजी फाळके, केशव मचाले, वैभव शिंदे असे आडतदार असून, बाळासाहेब फराटे यांच्याकडे सर्वाधिक दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

‘सध्या पाणीटंचाई सुरू आहे. काही ठिकाणी रब्बी पेरणी सुरू आहे. त्यामुळे बाजारात कमी माल विक्रीसाठी आणत आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल स्वच्छ व ग्रेडिंग करून आणल्यास आणखी जादा दर मिळेल.’
अनिल हिवरकर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती

इतर ताज्या घडामोडी
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली...नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या...नाशिक : चालू वर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्यानंतर...
ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या...नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती...
धुळे जिल्ह्यात किसान सन्मान योजनेत दोन...धुळे : जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी...
अमेरिकन लष्करी अळीमुळे मक्याची चाळणऔरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीकडून मका पिकाला...
पुरामुळे संगमेश्वर तालुक्यातील...रत्नागिरी  ः मुसळधार पावसामुळे संगमेश्‍वर...
अधिक नफ्यासाठी शेतकरी गटांनी कापूस...अमरावती : कापूस विक्रीऐवजी गाठी तयार करून...
सांगली जिल्ह्यात महापुरामुळे ६६ हजार...सांगली : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे...
पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांत...पुणे  : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस...
महाबीजच्या ‘गुणवत्ता नियंत्रण’ला  राज्य...अकोला ः शिवणी येथील महाराष्ट्र राज्य बियाणे...
नांदेड जिल्ह्यात ‘शेतकरी मानधन’ची विशेष...नांदेड :‘‘जिल्ह्यातील अल्प आणि अत्यल्प भू- धारक...
तीन वर्षांपासून ‘जलयुक्त’चे पुरस्कार...नगर  ः दुष्काळमुक्तीसाठी शासनाने राबविलेल्या...
सातारा जिल्ह्यातील १३४ पाणीपुरवठा...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुराने कृष्णा-कोयना या...
आमदार फोडण्याच्या नादात चंद्रकांतदादा...इस्लामपूर, जि. सांगली ः राज्यातील आमदार...
काटेमाठ खाल्ल्याने पाच जनावरे मृत्युमुखीकोपरगाव, जि. नगर  : बांधावरच्या गवतात...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...