agriculture news in marathi Baramati KVK given technical responsibilty for PMFME | Agrowon

अन्न उद्योग सक्षमीकरणात बारामती ‘केव्हीके’कडे तांत्रिक जबाबदारी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 2 डिसेंबर 2020

पुणे : सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे सक्षमीकरणाकरीता केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेत ‘राज्यस्तरीय तांत्रिक संस्था’ म्हणून बारामती कृषी विज्ञान केंद्राची (केव्हीके) निवड करण्यात आली आहे. 

पुणे : सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे सक्षमीकरणाकरीता केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेत ‘राज्यस्तरीय तांत्रिक संस्था’ म्हणून बारामती कृषी विज्ञान केंद्राची (केव्हीके) निवड करण्यात आली आहे. 

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेतून (पीएमएफएमइ) राज्यातील २० हजार उद्योगांचे सक्षमीकरण केले जाणार आहे. ही योजना केंद्राची असली तरी त्याची अंमलबजावणी राज्याच्या कृषी खात्याकडून केली जात आहे. योजनेसाठी ‘राज्यस्तरीय तांत्रिक संस्था’ निश्चित करण्याच्या हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. निवडीबाबत अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रात उत्सुकता  होती. 

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत सुरू होणाऱ्या या उन्नयन योजनेच्या राज्यस्तरीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून सध्या कृषी आयुक्त धीरज कुमार काम पाहत आहेत. त्यांना कृषी खात्याचे सहसचिव अशोक अत्राम यांनी तांत्रिक संस्थेच्या निवडीबाबत अंतिम निर्णय कळविला आहे. बारामती  कृषी विज्ञान केंद्राला या कामासाठी परभणी येथील अन्न प्रक्रिया महाविद्यालय तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने योग्य ती मदत करावी, अशा सूचना देखील शासनाने दिल्या आहेत. 

या योजनेतून राज्यातील  सुक्ष्म उद्योगाला प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्क्यांपर्यंत किंवा दहा लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सदस्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

बहुतांश समित्यांकडून पिके निश्‍चित
या उन्नयन योजनेत केंद्र सरकारने जिल्हास्तरीय समिती स्थापन करून प्रत्येक जिल्ह्यासाठी पीक निश्चित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील बहुतेक समित्यांनी पिके निश्चित केली आहेत. कृषी आयुक्तालयाने आधी निश्चित केलेल्या पिकांच्या यादीत काही बदल करण्यात आले आहे. नवी यादी आता राज्याच्या मुख्य सचिवांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये पन्नास हजार क्विंटल मका खरेदी...नगर ः शासनाने बंद केलेली मका खरेदी सुरू केली. नगर...
सांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदेसांगली ः सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे विभागात गहू क्षेत्रात ३६ हजार...पुणे ः गहू पेरणीस पोषक हवामान उशिराने तयार झाले....
संघटित कुक्कुटपालनातून ‘बर्ड फ्लू’चा...नाशिक : विभागात संघटित व शास्त्रीय पद्धतीने...
अण्णांच्या शेतकरी आंदोलनाला चार...नगर ः पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसद व ‘मेरे देश...
महाराष्ट्राच्या चित्ररथावर संत...राळेगणसिद्धी, जि. नगर : प्रजासत्ताकदिनी (ता. २६)...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाण्यात दोन...औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील...
जालना जिल्ह्यातील दोन केंद्रांत अडीच...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती व उपबाजार...
पाणीपुरवठ्यापासून एकही गाव वंचित...परभणी ः  ‘‘‘हर घर नल से जल’ योजनेअंतर्गत...
लिंबूवर्गीय फळांच्या आयातीवरील बंधने...२०२१ च्या सुरवातीस ब्रिटनने युरोपीय संघाच्या एकल...
पीकविमा सरसकट द्या; ‘प्रहार जनशक्ती’ची...नांदेड : पीकविमा मंजूर व्हावा म्हणून यापूर्वी...
मनमाडमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर...नाशिक : मनमाड येथे किसान सभेच्या वतीने ...
नगर जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास...नगर :  नगर जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेची...
समन्यायी पाणी वाटप आव्हानात्मक विषय : ...नांदेड : समन्यायी पाणी वाटप हा दिवसेंदिवस अत्यंत...
`मका खरेदीची प्रक्रिया शुक्रवारपर्यंत...नाशिक: ‘‘मका खरेदीसाठी शासनाने ३२ जानेवारी पर्यंत...
तीन हजार महिलांना देणार रोजगार : विजय...चंद्रपूर : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला...
पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका : राजू...सांगली : केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांवर...
मका खरेदीचे कमी उद्दिष्ट, शेतकऱ्यांसमोर...बुलडाणा : मका खरेदीसाठी शासनाने नवे उद्दिष्ट देऊन...
सांगलीत यंदा चारा टंचाई भासणार नाहीसांगली ः गेल्या वर्षी जिल्ह्यातील दुष्काळी...
‘किसान गणतंत्र परेड’साठी शेतकऱ्यांचे...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी...