बारामती मंडलात १२२४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Baramati Mandal disconnects power supply of 1224 customers
Baramati Mandal disconnects power supply of 1224 customers

पुणे ः महावितरणच्या बारामती मंडलाअंतर्गत वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदार एक हजार २२४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या वर्गवारीतील चार हजार ९२४ थकबाकीदारांनी दोन कोटी ६८ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे, अशी माहिती महावितरण विभागाच्या सूत्रांनी दिली.

महावितरणकडून सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात रकमेचे थकबाकीदार असणाऱ्या वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात बारामती मंडलाअंतर्गत बारामती व इंदापूर तालुक्यात २६ लाख ६५ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी ४०१ वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर एक हजार ८४४ वीज ग्राहकांनी ७३ लाख १४ हजार रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. 

दौंड व शिरूर तालुक्यात एक कोटी २६ लाख रुपयांच्या थकबाकीमुळे ६९३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर एक हजार ९८९ ग्राहकांनी एक कोटी ५३ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. तसेच भोर व पुरंदर तालुक्यात २४ लाख ९५ हजार रुपयांच्या थकबाकीमुळे १५१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर १०९१ थकबाकीदारांनी ४२ लाख २० हजार रुपयांचा भरणा केला आहे. तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर ग्राहक करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी करवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

तसेच घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे, हे न पाहता नियमांच्या अधीन राहून या सर्वच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्र ई वाँलेटची सोय उपलब्ध आहे. तसेच चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी www.mahadirbmo.in या वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे आॅनलाइन सोय उपलब्ध आहे. वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com