भोपळ्यापासून बर्फी, चिक्की

भोपळा हृदयरोगांसाठी उपयुक्त आहे. यातील घटक कोलेस्ट्रॉल कमी करतात, भोपळा उष्णता कमी करणारा आणि मूत्रवर्धक आहे. रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित करतो. रस स्वास्थ्यवर्धक मानला जातो.
Barfi and Chikki from Pumpkin 
Barfi and Chikki from Pumpkin 

भोपळा हृदयरोगांसाठी  उपयुक्त आहे. यातील घटक कोलेस्ट्रॉल कमी करतात, भोपळा उष्णता कमी करणारा आणि मूत्रवर्धक आहे. रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित करतो. रस स्वास्थ्यवर्धक मानला जातो. भोपळ्यामध्ये बीटा केरोटीन असते, ज्यामुळे जीवनसत्त्व अ मिळते. पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या भोपळ्यात केरोटीनचे प्रमाण जास्त असते. भोपळ्याच्या बी मध्ये लोह, जस्त, जिंक, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम  असते. भोपळ्यातील पोषक मूल्ये (प्रती १०० ग्रॅम) 

  • उष्मांक- २६ किलोकॅलरी , २ ग्रॅम  साखर , ०.१ ग्रॅम  फॅट 
  • प्रथिने- १ ग्रॅम
  • जीवनसत्त्वे-अ -१७० टक्के , क - १५ टक्के , ब ६- ५ टक्के 
  • खनिजे- कॅल्शिअम २ टक्के, आयर्न  ४ टक्के , मॅग्नेशियम ३ टक्के.
  • बर्फी  

  • दहा किलो भोपळे स्वछ धुवून त्याचा सगळा गर काढून घ्यावा. काढलेला गर एका कढई मध्ये घेऊन त्यामध्ये ५ किलो साखर टाकून त्याचे मिश्रण तयार करावे.
  • मिश्रणाला १५ ते २० मिनिटे ६० अंश सेल्सिअस तापमानावर उष्णता द्यावी. नंतर एका कढई मध्ये १ लिटर दूध घेऊन त्यामध्ये पाव किलो खवा आणि पाव किलो दूध पावडर मिसळावी.
  • तयार झालेल्या मिश्रणामध्ये भोपळ्याचा गर मिसळून घ्यावा. त्याला मंद आचेवर १० ते १५ मिनिटे उष्णता द्यावी.
  • तयार झालेले मिश्रण एका तूप लावलेल्या सपाट ट्रे मध्ये पसरून थंड करावे. त्याचे चौकोनी तुकडे करून हवाबंद बरणीमध्ये ठेवावेत.
  • पौष्टिक खीर

  • भोपळा वाफवून घ्यावा. नंतर थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून कढईत तूप गरम झाले की तूप सुटेपर्यंत तो परतून घ्यावा. नंतर साखर घालून शिजवून घ्यावा.
  • थोड्या वेळाने दूध मिसळावे. यामध्ये वेलची पावडर, सुका मेवा भरड घालून आणखी पाच मिनिटे शिजल्यावर त्यात गुलकंद मिसळावा. यामध्ये मनुका व केशर मिसळून खीर तयार करावी. 
  • बियांची चिक्की 

  • एक किलो गूळ बारीक करून घ्यावा. त्याबरोबर पाऊण किलो शेंगदाणे आणि २५० ग्रॅम भोपळ्याच्या बिया (साल काढलेल्या ) आणि त्यात २ ग्रॅम तुळशीची पाने वाळवून त्याची पूड मिसळावी. 
  • प्रथम एका कढईमध्ये गूळ घेऊन तो ६५ अंश सेल्सिअस तापमानावर १५ मिनिटे गरम करावा. गूळ चांगला पातळ होईल इतकी उष्णता द्यावी. 
  • अजून एका कढईमध्ये शेंगदाणे घेऊन  ६५ अंश सेल्सिअस तापमानावर ५ मिनिटे भाजून त्याची साल काढून दोन भाग करावेत. तसेच भोपळ्याच्या बिया सुद्धा ६० अंश सेल्सिअस तापमानावर २ ते ३ मिनिटे भाजून घ्याव्यात. त्यानंतर सर्व भाजून घेतलेले पदार्थ एकत्र करावे. 
  • प्रथम एका कढईमध्ये गूळ घ्यावा. तो पातळ करावा. त्यानंतर त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे व भोपळ्याच्या बिया आणि तुळशीच्या पानाची पूड मिसळावी. नंतर सगळ्या  मिश्रणाला ५ मिनिटे उष्णता द्यावी.
  • एका पसरट भांड्याला तूप लावून  चिक्कीचे मिश्रण  भांड्यामध्ये पसरून घ्यावे. आणि गरम असताना सुरीच्या साहाय्याने तुकडे करावेत. तयार झालेली चिक्की एका हवाबंद बाटलीमध्ये ठेवावी.  
  • चिक्कीमधील पोषक मूल्ये (प्रती १०० ग्रॅम) 

  • उष्मांक ..........१२७ किलो कॅलरी , ०.१ ग्रॅम साखर , २१. ४  ग्रॅम फॅट
  • प्रथिने ............०. ९  ग्रॅम 
  • कर्बोदके.. ........५० टक्के 
  • खनिजे ............कॅल्शिअम २० टक्के, लोह ०. ९ टक्के, सोडिअम ३० टक्के
  • संपर्क- आरती मुंडे, ९५०३०८२५६४  (आचार्य पदवी विद्यार्थी, अन्नतंत्रज्ञान विभाग,सॅम हिगिनबॉटम कृषी, प्रौद्योगिक आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तरप्रदेश)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com