Agriculture news in marathi Barfi and Chikki from Pumpkin | Agrowon

भोपळ्यापासून बर्फी, चिक्की

आरती मुंडे 
मंगळवार, 21 जुलै 2020

भोपळा हृदयरोगांसाठी  उपयुक्त आहे. यातील घटक कोलेस्ट्रॉल कमी करतात, भोपळा उष्णता कमी करणारा आणि मूत्रवर्धक आहे. रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित करतो. रस स्वास्थ्यवर्धक मानला जातो.

भोपळा हृदयरोगांसाठी  उपयुक्त आहे. यातील घटक कोलेस्ट्रॉल कमी करतात, भोपळा उष्णता कमी करणारा आणि मूत्रवर्धक आहे. रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित करतो. रस स्वास्थ्यवर्धक मानला जातो.

भोपळ्यामध्ये बीटा केरोटीन असते, ज्यामुळे जीवनसत्त्व अ मिळते. पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या भोपळ्यात केरोटीनचे प्रमाण जास्त असते. भोपळ्याच्या बी मध्ये लोह, जस्त, जिंक, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम  असते.

भोपळ्यातील पोषक मूल्ये (प्रती १०० ग्रॅम) 

  • उष्मांक- २६ किलोकॅलरी , २ ग्रॅम  साखर , ०.१ ग्रॅम  फॅट 
  • प्रथिने- १ ग्रॅम
  • जीवनसत्त्वे-अ -१७० टक्के , क - १५ टक्के , ब ६- ५ टक्के 
  • खनिजे- कॅल्शिअम २ टक्के, आयर्न  ४ टक्के , मॅग्नेशियम ३ टक्के.

बर्फी  

  • दहा किलो भोपळे स्वछ धुवून त्याचा सगळा गर काढून घ्यावा. काढलेला गर एका कढई मध्ये घेऊन त्यामध्ये ५ किलो साखर टाकून त्याचे मिश्रण तयार करावे.
  • मिश्रणाला १५ ते २० मिनिटे ६० अंश सेल्सिअस तापमानावर उष्णता द्यावी. नंतर एका कढई मध्ये १ लिटर दूध घेऊन त्यामध्ये पाव किलो खवा आणि पाव किलो दूध पावडर मिसळावी.
  • तयार झालेल्या मिश्रणामध्ये भोपळ्याचा गर मिसळून घ्यावा. त्याला मंद आचेवर १० ते १५ मिनिटे उष्णता द्यावी.
  • तयार झालेले मिश्रण एका तूप लावलेल्या सपाट ट्रे मध्ये पसरून थंड करावे. त्याचे चौकोनी तुकडे करून हवाबंद बरणीमध्ये ठेवावेत.

पौष्टिक खीर

  • भोपळा वाफवून घ्यावा. नंतर थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून कढईत तूप गरम झाले की तूप सुटेपर्यंत तो परतून घ्यावा. नंतर साखर घालून शिजवून घ्यावा.
  • थोड्या वेळाने दूध मिसळावे. यामध्ये वेलची पावडर, सुका मेवा भरड घालून आणखी पाच मिनिटे शिजल्यावर त्यात गुलकंद मिसळावा. यामध्ये मनुका व केशर मिसळून खीर तयार करावी. 

बियांची चिक्की 

  • एक किलो गूळ बारीक करून घ्यावा. त्याबरोबर पाऊण किलो शेंगदाणे आणि २५० ग्रॅम भोपळ्याच्या बिया (साल काढलेल्या ) आणि त्यात २ ग्रॅम तुळशीची पाने वाळवून त्याची पूड मिसळावी. 
  • प्रथम एका कढईमध्ये गूळ घेऊन तो ६५ अंश सेल्सिअस तापमानावर १५ मिनिटे गरम करावा. गूळ चांगला पातळ होईल इतकी उष्णता द्यावी. 
  • अजून एका कढईमध्ये शेंगदाणे घेऊन  ६५ अंश सेल्सिअस तापमानावर ५ मिनिटे भाजून त्याची साल काढून दोन भाग करावेत. तसेच भोपळ्याच्या बिया सुद्धा ६० अंश सेल्सिअस तापमानावर २ ते ३ मिनिटे भाजून घ्याव्यात. त्यानंतर सर्व भाजून घेतलेले पदार्थ एकत्र करावे. 
  • प्रथम एका कढईमध्ये गूळ घ्यावा. तो पातळ करावा. त्यानंतर त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे व भोपळ्याच्या बिया आणि तुळशीच्या पानाची पूड मिसळावी. नंतर सगळ्या  मिश्रणाला ५ मिनिटे उष्णता द्यावी.
  • एका पसरट भांड्याला तूप लावून  चिक्कीचे मिश्रण  भांड्यामध्ये पसरून घ्यावे. आणि गरम असताना सुरीच्या साहाय्याने तुकडे करावेत. तयार झालेली चिक्की एका हवाबंद बाटलीमध्ये ठेवावी.  

चिक्कीमधील पोषक मूल्ये (प्रती १०० ग्रॅम) 

  • उष्मांक..........१२७ किलो कॅलरी , ०.१ ग्रॅम साखर , २१. ४  ग्रॅम फॅट
  • प्रथिने............०. ९  ग्रॅम 
  • कर्बोदके..........५० टक्के 
  • खनिजे............कॅल्शिअम २० टक्के, लोह ०. ९ टक्के, सोडिअम ३० टक्के

संपर्क- आरती मुंडे, ९५०३०८२५६४ 
(आचार्य पदवी विद्यार्थी, अन्नतंत्रज्ञान विभाग,सॅम हिगिनबॉटम कृषी, प्रौद्योगिक आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तरप्रदेश)


इतर कृषी प्रक्रिया
लघू प्रक्रिया उद्योगांना चांगली संधीलघू उद्योगासाठी बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी...
ड्रॅगन फळापासून कॉर्डीयल, स्क्वॅश...ड्रॅगन फळ हे हायलोसेरियस आणि सेलेनेसियस या...
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
मखानापासून बनवा बर्फी, लाह्या अन् चिक्कीदलदलीच्या क्षेत्रात उगवणारे मखाना हे भरपूर...
कृषी क्षेत्रामध्ये आहेत व्यावसायिक संधीव्यावसायिक संधी म्हणून शेती व संलग्न बाबींकडे...
चिकूपासून बनवा आइस्क्रीमआइस्क्रीम हा लहानथोराच्या आवडीचा विषय आहे. त्याला...
पपईपासून पेपन,पेक्टिन निर्मितीपपईचे फळ पचनास मदत करते. त्याचा गर व बिया औषधी...
भोपळ्यापासून बर्फी, चिक्कीभोपळा हृदयरोगांसाठी  उपयुक्त आहे. यातील घटक...
चिकूपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थचिकू  (शा. नाव ः मैनिलकारा जपोटा) हे गोड,...
प्रक्रिया उद्योगातही मशरूमला मागणीवाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि...
शेळीच्या दुधापासून दही, लोणी, चीज, मलईशेळीचे दूध पचनास हलके असते. शेळीच्या दुधापासून...
श्रीवर्धनी सुपारीचे संवर्धन आवश्यकसुपारी हे परपरागीकरण होणारे झाड असल्याने...
फणसामध्ये आहे प्रक्रिया उद्योगाची संधीफणसातील गरे तसेच बिया खाण्यायोग्य असून गरापासून...
फणसापासून तयार करा खाकरा, केक अन् लोणचेविविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी फणस बी...
प्रक्रिया उद्योगात गवती चहाला मागणीगवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत...
बहुगुणी शेवग्याचे मूल्यवर्धित पदार्थशेवग्यामध्ये उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य आहेत....
प्रक्रिया अन् आरोग्यासाठी शेवगाशेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारे मेगा...शेतकरी, प्रक्रिया करणारे आणि किरकोळ विक्रेत्यांना...
कोकमपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकम फळ कच्चे असताना व पिकून लाल रंगाचे झाल्यावर...
करवंदापासून बनवा चटणी,जॅम, लोणचेकरवंद प्रक्रियेसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची...