बार्शीटाकळी येथे जवस शेती दिन कार्यक्रम

बार्शीटाकळी येथे जवस शेती दिन कार्यक्रम
बार्शीटाकळी येथे जवस शेती दिन कार्यक्रम

अकोला  ः शेतकऱ्यांनी हवामान अनुकूल बदल स्वीकारणे आता काळाची गरज झाली आहे. त्यासाठी जवस हे पीक स्वीकारून रब्बी हंगामात पीक बदल करावा. पुढील रब्बी हंगामात ५००० एकर क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांना जवस लागवडीचे प्रात्यक्षिक देण्याचे उद्दिष्ट्य गळीत धान्य कार्यक्रमात ठेवले आहे. याकरिता प्रत्येक गावांत २५ एकराचे २५ शेतकऱ्यांचे एक क्लस्टर तयार करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी दिली.  अखिल भारतीय समन्वयित जवस व मोहरी संशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय नागपूरअंतर्गत जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे प्रकाश माणिकराव यांच्या शेतात जवस शेती दिन कार्यक्रम झाला. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सेवानिवृत्त कृषी अधिकारी कुवरसींह मोहने, प्रगतिशील शेतकरी गणेश नानोटे, नितीन उजाडे, डॉ. बिना नायर, डॉ. जीवन कतोरे, डॉ. शिल्पा रणनवरे, रूपाली दामदर व गोपाल कवळकर आदींची प्रमुख उपस्‍थिती होती.  डॉ. खर्चे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, की शेतकऱ्यांनी जवस व मोहरी या पिकांचे भविष्यातील महत्त्व लक्षात घेऊन पेरणी क्षेत्र वाढवावे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जवस हे पीक फायद्याचे ठरेल. जवसांपासून तेल व धागा निर्मिती सुध्दा होते. रब्बी हंगामाकरिता एक पर्यायी पीक म्हणून जवस निवडावे. या वेळी श्री. मोहने, प्रगतिशील शेतकरी श्री. नानोटे यांनीही मार्गदर्शन केले. प्रकाश माणिकराव, नितीन उजाडे यांनी जवसाचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे डॉ. खर्चे, मोहन वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com