agriculture news in marathi, barriers to starting mhaisal irrigation scheme, sangli, maharashtra | Agrowon

म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू होण्यात अडथळे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

सांगली  ः म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात सहा साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांनी सहकार्य केल्यास ही योजना सुरळीत चालू शकते. मात्र, या साखर कारखान्यांनी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने ही योजना सुरू होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत.

सांगली  ः म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात सहा साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांनी सहकार्य केल्यास ही योजना सुरळीत चालू शकते. मात्र, या साखर कारखान्यांनी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने ही योजना सुरू होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यातील शेतीला लाभ होतो. यामुळे या भागात द्राक्ष, डाळिंब आणि उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, पाणीपट्टी आणि वीजबिल थकबाकीमुळे ही योजना सुरू होण्यासाठी अडथळे निर्माण होतात. पाणीपट्टी वसुलीसाठी पाटबंधारे विभागात अधिकारी संख्या कमी असल्याने वसूली होत नाही. यामुळे थकबाकीत वाढ होते आहे. 

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे २०१८ अखेर वीजबिल आणि पूर्वीची थकबाकी रक्कम ३० कोटी ९४ लाख ३० हजार इतकी झाली आहे. ही थकबाकी वाढीस कारखाना कारणीभूत आहे. लाभ क्षेत्रात या योजनेचे पाणी जाते. सभासद कारखान्यास ऊस गाळपाला देतात. मात्र, पाणीपट्टी वसूल करण्यासाठी साखर कारखाने पुढे येत नाहीत. त्यामुळे जे शेतकरी पैसे भरून पाणी घेतात, त्यांना पाणी मिळत नाही.

दरम्यान, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून उसाच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. याचा फायदा येथील साखर कारखान्यांनी होतो आहे. लाभ क्षेत्रातील ऊस सहा साखर कारखान्यांना दिला जातो. कारखान्यांकडून शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची कपात करून घेण्यासाठी खोडा घातल्याने शाश्‍वत वसुली होत नाही. गतवर्षी या कारखान्यांकडून लाभ क्षेत्रातील सुमारे ३० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. जर टनाला शंभर रुपये कपात करून घेतली तर कोणतीच अडचण येणार नाही.

कारखान्यांकडून प्रतिटनाला शंभर रुपये घ्या
गेल्या पंधरा दिवसांत पाटबंधारे विभागात कारखाना प्रतिनिधी, शेतकरी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यामध्ये पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिटनाला शंभर रुपये पाणीपट्टी जमा केली तर थकबाकीचा प्रश्‍नच उरणार नाही, असे सुचवले होते. मात्र, कारखान्याचे प्रतिनिधी म्हणाले, तुमच्या अधिकाऱ्यांकडूनदेखील पाणीपट्टीची वसुली होतेच; मग आम्ही ऊस उत्पादकांकडून पाणीपट्टीसाठी प्रतिटन शंभर रुपये जमा केले तर, ऊस उत्पादक शेतकरी आमच्याकडे गाळपाला ऊस देत नाहीत. त्यामुळे तुमच्या पातळीवर पाणीपट्टी वसुलीचे धोरण राबवा, असे सांगून साखर कारखानदारांनी आपली जबाबदारी झटकून दिली. त्यामुळे पुन्हा पाणीपट्टी वसुलीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.
 
 

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची जूनअखेरची थकबाकी (रुपये - कोटी)
वीजबिल   ३०.९४
पाणीपट्टी २५.००
एकूण  ५५.९४

 

इतर ताज्या घडामोडी
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...
नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने...
हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना...उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद...
‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म...अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन...
राज ठाकरे यांची दिवसभर चौकशीमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत...
मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरींसाठी ३७४...पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...