मराठवाड्यात छावणीचा सव्वापाच लाख जनावरांना आधार

छावणीचा सव्वापाच लाख जनावरांना आधार
छावणीचा सव्वापाच लाख जनावरांना आधार

औरंगाबाद : भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत साडेसातशे चारा छावण्या सुरू आहेत. त्यामध्ये सव्वापाच लाखांवर जनावरे दाखल झाली आहेत, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. मराठवाड्यातील चारा-पाण्याविना तडफडणाऱ्या जनावरांसाठी या छावण्या आधार ठरल्या आहेत. 

प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपर्यंत (ता. २८) औरंगाबाद जिल्ह्यात ६० चारा छावण्यांना मंजुरात देण्यात आली. त्यापैकी २६ चारा छावण्या प्रत्यक्षात सुरू आहेत. त्यात मोठी २३ हजार ९४३, तर लहान ३६०६ अशी २७ हजार ५४९ जनावरे आहेत. जालना जिल्ह्यात मंजुरी मिळालेल्या ४२ चारा छावण्यांपैकी ३१ छावण्या सुरू झाल्या. त्यामध्ये १६ हजार ७२९ मोठी, तर २९८१ लहान मिळून १९ हजार ७१० जनावरांना आसरा मिळाला. 

उस्मानाबाद जिल्ह्यात १०५ चारा छावण्यांना मंजुरी मिळाली. त्यापैकी ९० चारा छावण्या सुरू असून, ६५ हजार ४३५ मोठी, तर ८ हजार १२७ लहान अशा ७३ हजार ५६२ जनावरांना आधार मिळाला आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९३३ चारा छावण्यांना मंजुरी मिळाली. त्यापैकी प्रत्यक्षात ६०३ चारा छावण्या सुरू झाल्या. त्यामध्ये मोठी ३ लाख ७३ हजार ६२३,  तर लहान ३० हजार ५७४ अशी ४ लाख ४ हजार १९७ जनावरे दाखल झाली. 

शासनाने जनावरांसोबतच शेळ्या व मेंढ्यांसाठीही छावण्या सुरू करण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने मराठवाड्यात शेळ्या, मेंढ्यांसाठी किती चारा छावण्या सुरू केल्या जातात हा प्रश्‍न आहे.

दुष्काळात होरपळणाऱ्या पशुपालकांना दिलासा दुष्काळाच्या दाहकतेत होरपळणाऱ्या चारही जिल्ह्यातील पशुपालक आपली बहुतांश जनावरे छावणीतील दावणीला घेऊन जात आहेत. तिथे त्यांना जगविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. किमान चारा, पाण्याची सोयसुद्धा मोठा दिलासा ठरत असल्याची भावना पशुपालक व्यक्‍त करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com