दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधार

दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधार
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधार

शिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा सोसत असलेल्या शिरूर कासार तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीमध्ये चिंचाच्या झाडाने आधार दिला आहे. अनेक गावांत चिंचाच्या उत्पन्नवर घरखर्च भागू लागल्या असल्याने आजोबाने लावल्याली बांधावरच्या चिंचेच्या झाडाचा नातवाला दुष्काळात आधार मिळाला आहे. जुन्या काळात लावलेल्या झांडाना आता चिंचा लगडल्या आहेत. 

शिरूर कासार तालुक्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना टॅंकरच्या पाण्यावर तहान भागावी लागत आहे. तालुक्यातील काही गावात पशुधनाला छावण्याचा आश्रय मिळाला आहे. तर शेतामध्ये शेतकरी; मजुराला काम नाही तर तालुक्यात रोजगार हमीच्या मस्टवर कागदपत्र २८०० मजूर आहेत. पण मजुराच्या हाताला काम नाही. 

त्यामुळे दैनंदिन खर्चासाठी पैसा नाही. अशा स्थितीमध्ये शेतकरी आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. मात्र, तालुक्यातील तब्बल ९५ गावे, वस्त्यांवर चिंचेची झाडे दुष्काळात अधार बनली आहेत. आजोबांनी लावलेल्या चिंचेची झाडांमुळे नातवाचा घर खर्च भागू लागला सल्याने दुष्काळी स्थितीमध्ये नातवाला तिसऱ्या पिढीला फायदा होत आहे.

बाजारपेठ नसल्याचा परिणाम  शिरुर कासार, बीड भागात चिंच विक्रीला बाजारपेठ नाही. त्यामुळे या भागातील लोकांना शंभर किलोमीटर अंतरावरील नगरला जावे लागते. मात्र, या भागात बाजारपेठ नसल्याचा परिणाम चिंचेपासून मिळणाऱ्या पैशावर झाला आहे. तालुक्यात चिंचेची २७०० रुपये प्रतिक्विंटल दराने व्यापारी खरेदी करत आहेत. हाच तर चिंचे फोडून बाजारात विकली तर तो सात ते हजार रुपये प्रतिक्विंटल आहे.

आमचे आजोबा महादेव गंडाळ यांनी आमच्या मळ्यात शंभर वर्षांपूर्वी बांधावर चिंचेचे झाडे लावले होते. त्या झाडाचे उत्पन्न माझ्या वडीलांपासून मिळत असून ते मला ही दुष्काळ परिस्थितीमध्ये त्याचा आधार मिळाला आहे. - कृष्णा गंडाळ, झापेवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com