राज्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या घटत असताना आठ-पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत म
अॅग्रोमनी
‘बासमती’ची तांदळाचा तुटवडा
गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या किसान आंदोलनाचा फटका बासमती तांदळाला बसला आहे. सीमा बंद असल्याने या तांदळाच्या वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी मागणी इतका तांदूळ उपलब्ध होत नसल्याने बासमती तांदळाच्या दरात क्विंटलला सरासरी १००० रुपयांनी वाढ झाली आहे.
कोल्हापूर: गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या किसान आंदोलनाचा फटका बासमती तांदळाला बसला आहे. सीमा बंद असल्याने या तांदळाच्या वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी मागणी इतका तांदूळ उपलब्ध होत नसल्याने बासमती तांदळाच्या दरात क्विंटलला सरासरी १००० रुपयांनी वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बासमतीचे उत्पादन चांगले असले तरी आंदोलनाचा फटका या तांदळाला बसला. आंदोलन संपल्यानंतरच बासमती तांदूळ देशातील विविध बाजारपेठांत आवश्यक त्या प्रमाणात पोचू शकणार असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. यंदाचा हंगाम १५ नोव्हेंबरला सुरु झाला. हंगाम सुरु झाल्यानंतर काहीच दिवसातच आंदोलन सुरु झाले. यामुळे बासमतीची पंजाब, हरियानातून होणारी वाहतूक विस्कळित झाली. राइस मिल धारकही धोका पत्करून तांदळाची वाहतूक करण्यास नकारघंटा देत आहेत. परिणामी पुरेशा प्रमाणात हा तांदूळ मिळणे अशक्य बनले आहे.
बासमती तांदळाला देशाबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातूनही मोठी मागणी असते. गेल्या काही वर्षापासून पारंपारिक बासमती तांदूळ घेण्याचे प्रमाण नगण्य बनत आहे. याऐवजी बासमतीची हायब्रीड व्हरायटी ११२१, १५०९, शेला बासमती आदि प्रकारांना मागणी वाढतानाचे चित्र आहे. शेतकऱ्यांनाही पारंपारिक बासमती तांदळापेक्षा हायब्रीड व्हयरायटी उत्पन्नाच्या दृष्टीने फायदेशीर होत असल्याने शेतकऱ्यांचीही या व्हरायटीला पसंती आहे. याची लांबीही पारंपारिकपेक्षा जास्त असते. यामुळे ती व्यावसायिकांनाही परवडते.
आंतरराष्ट्रीय बाजारातून मागणी कायम
भारत प्रमुख निर्यातदार देश आहे. यंदाही आंतरराष्ट्रीय बाजारातून मागणी कायम आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२० अखेर ३१ लाख टन बासमतीची निर्यात झाली. अजूनही निर्यात सुरू असून ती ४५ लाख टनापर्यंत जाईल, असा अंदाज व्यापारी सूत्रांचा आहे
यंदा बासमतीचे पीक चांगले आहे. पंजाब हरियाना सीमेवर सुरु झालेल्या किसान आंदोलनामुळे खरेदी विक्री प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे दरात वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामाचा आढावा घेतल्यास यंदा निर्यातही चांगली होइल. नॉन बासमतीप्रमाणे बासमती तांदळालाही चांगली मागणी राहील हे निश्चित.
- राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम)
- 1 of 30
- ››